Home Breaking News ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन: एनएक्सजी कॉईन प्रा. लिमि. फसवणूक...

ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन: एनएक्सजी कॉईन प्रा. लिमि. फसवणूक प्रकरण

126

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.31मार्च):- एनएक्सजी कॉईन एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड मध्ये गुंतवणूक सांगून आयडी तयार करण्याकरीता 50 हजार रूपये व महिंद्रा एक्सयुव्ही 300 वाहन देण्याचे खोटे आमिष दाखवून आरोपी रमेश सखाराम भाष्कर, मंगलदास तुलाराम वरखडे यांनी, फिर्यादी कार्तीक रमेश खंगार इतर गुंतवणुकदारांची 14 लक्ष रूपयाची आर्थिक फसवणुक केल्याबाबतचा गुन्हा पोलिस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

आरोपीच्या चौकशीमध्ये चंद्रपुर जिल्हयातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. तरी गुंतवणूकदाराची ठेवी परत करण्याकरीता महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षण) अधिनियम सन 1999 अन्वये कार्यवाही करीता एनएक्सजी कॉईन, एस.डी. हब (ओपीसी) प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळण्याकरीता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे वैध दस्ताऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फार्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुले, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अभिषेक बागडे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर श्रीरामे, पोलिस हवालदार प्रभाकर तलांडे हे करीत असून नमुद आरोपी रमेश सखाराम भाष्कर (वय 33 वर्षे) रा. स्नेहनगर परळी वैद्यनाथ जि. बीड, आणि मंगलदास तुलाराम वरखडे, (वय 49 वर्षे), रा. हनुमान मंदीर जवळ लोहारा ता. जि. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here