Home महाराष्ट्र माता रमाई जयंतीनिमित्त रविवारी ‘मी रमाई बोलतेय’ नाट्यप्रयोगाचे आयोजन

माता रमाई जयंतीनिमित्त रविवारी ‘मी रमाई बोलतेय’ नाट्यप्रयोगाचे आयोजन

161

▪️हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे भारतीय बौद्ध महासभाचे आवाहन

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19फेब्रुवारी):-माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर (दि.२२ फेब्रुवारी रविवार) रोजी दुपारी १२ वाजता पुणे येथील ज्येष्ठ कवयित्री व प्रसिद्ध अभिनेत्री प्रा.रमणी सोनवणे यांचा ‘मी रमाई बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.हा नाट्यप्रयोग माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष,त्याग आणि प्रेरणादायी कार्यावर आधारित असून,त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू प्रभावी अभिनयातून उलगडले जाणार आहेत.ग्रामीण व शहरी भागातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गंगाखेड तालुका शाखेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या भाची शुभांगी वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडितराव पारवे राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये तहसीलदार उषाकिरण शृंगारे,पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, नगर परिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,स.गटविकास अधिकारी जे. व्ही.मोडके,बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे,उपप्राचार्य प्रा.डॉ.संतोष गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा परभणीचे आनंदा भेरजे,तुकाराम ढगे,एम.एम.भरणे,गोरखनाथ कांबळे,दिलीप देवरे,लहूराज केदारे,चंद्रगुप्त घनसावंत,रमेश जोंधळे यांच्यासह समता सैनिक दलाचे प्रतिनिधीही उपस्थित राहनार आहेत.माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षातून समाजाला प्रेरणा मिळावी त्यांच्या त्यागमय आयुष्याची जाणीव नव्या पिढीला व्हावी आणि सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापक व्हावा,या उद्देशाने या विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे या नाट्यप्रयोगास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here