Home चंद्रपूर पेलोरा चे उध्दव पाटील उरकुडे श्री गुरुदेव समर्पित सेवा पुरस्काराने सन्मानित 

पेलोरा चे उध्दव पाटील उरकुडे श्री गुरुदेव समर्पित सेवा पुरस्काराने सन्मानित 

152

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11फेब्रुवारी):-पेलोरा येथील रहिवासी, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते उध्दव पाटील उरकुडे यांना दिवंगत चिमनाबाबू झाडे स्मृती श्री गुरुदेव समर्पित सेवा पुरस्काराने‌ सन्मानित करण्यात आले. २० आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट) येथे नुकतेच संपन्न झाले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आम. कोवा लक्ष्मी, गुरुकुंज आश्रम मोझरी चे प्रचार प्रमुख गोपालराव कडू, ग्राम. बंडोपंत बोढेकर, परिषदेचे चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, उपाध्यक्ष विलास उगे, श्रीकांत धोटे , सुभाष पावडे, अर्जुन पारुडकर यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

    गेल्या चाळीस वर्षांपासून श्री. उध्दव पाटील उरकुडे हे सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक कार्यात असून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. पेलोरा येथे दैनंदिन सामुदायिक प्रार्थना आणि परमहंस बाजीराव महाराज यांच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. पुरस्कार मिळाल्याबद्दल परिषदेचे संजय पोडे, डॉ. श्रावण बानासुरे, धम्ममित्र नामदेव गेडकर, संध्या पोडे, एड. रोटे, विनायक साळवे, विलास चौधरी, डॉ . उदार महाराज, उमेश कडू , देवराव कोंडेकर, एड. सारिका जेनेकर, ग्राम. चेतन ठाकरे, विजय लाडेकर, सुखदेव चौथाले, नामदेव पिज्दूरकर, गणेश मांडवकर, भाऊराव बोबडे, डॉ . संजय लोहे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here