Home महाराष्ट्र सिंदपुरी रुयाळ येथे केंद्रीय संविधान रक्षक संघटनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त त्याग मूर्ती रमाई...

सिंदपुरी रुयाळ येथे केंद्रीय संविधान रक्षक संघटनेतर्फे वर्धापन दिनानिमित्त त्याग मूर्ती रमाई जयंती,भोजनदान , पाणीवाटप, प्रबोधन कार्यक्रम संपन्न 

126

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.9फेब्रुवारी):–पवनी तालुक्यातील सिंदपुरी रुयाळ येथे दिनांक 8 फेब्रुवारी 2026 ला सिंदपुरी रुयाळ येथे वर्धापन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना व महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे त्या त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती,प्रबोधन कार्यक्रम , भोजनदान , पाणी वाटप, केंद्रीय संविधान रक्षक चे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र सदर कार्यक्रमात वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सदानंद धारगावे केंद्रीय संविधान रक्षक संस्थापक/सचिव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक भाविक सुखदेवे ब्रह्मपुरी होते.

तर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू संघ,नम्रता बागडे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना, लक्ष्मण दुबे, जीवन बोधी बौद्ध,,वैशालीताई टेंभुरकर, भीमरावजी वैद्य, तागडे, पांडुरंग नंदागवळी, लक्ष्मण दुबे, आस्तिक नंदागवळी, , कविता सुखदेवे, स्वामींनी मेश्राम, हर्षा मेश्राम , सारिका नागदेवे महासचिव महाराष्ट्र राज्य, शोभना सरोजकर विदर्भ अध्यक्षा, वैशाली वालदे विदर्भ महासचिव ,वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष, सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अस्मिता नगराळे नागपूर जिल्हा अध्यक्षा,भावना शेंडे , स्नेहल मेश्राम ,भारती कांबळे ,पूजा पाटील ,ज्योती रामटेके, पोर्णिमा वैद्य, भीमराव वैद्य, घरडे सर, आस्तिक नंदा गवळी, कविता सुखदेवे ,स्वामिनी मेश्राम ,हर्षा मेश्राम, संघमित्रा चव्हाण, अर्पणा जांगडे, दिपाली गजभिये ,बिंदूताई रामटेके ,आशिष मेश्राम, पांडुरंग नंदागवळी, हेमंत मेंदवाडे, पचारे सरपंच मॅडम, व डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटना , महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटना ,विदर्भवादी शेतकरी संघटना ,व केंद्रीय संविधान रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here