Home महाराष्ट्र प्रा.संदीप राठोड यांनी पीएच. डी. मिळवल्याबद्दल त्यांचा वेणूताई चव्हाण कॉलेजच्या वतीने सत्कार

प्रा.संदीप राठोड यांनी पीएच. डी. मिळवल्याबद्दल त्यांचा वेणूताई चव्हाण कॉलेजच्या वतीने सत्कार

162

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.10ऑक्टोबर):-येथील वेणूताई चव्हाण कॉलेज मध्ये ज्युनिअर विभागातील वाणिज्य शाखेमध्ये अध्यापन करणारे प्रा.संदीप राठोड यांना पीएच. डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांना पीएच. डी. मिळाल्याबद्दल त्यांचा वेणूताई चव्हाण कॉलेज च्या वतीने प्राचार्य डॉ आर आर जाधव यांनी सत्कार केला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील जमशेटपूर हे त्यांचे मुळ गाव त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण विकास कार्यक्रमाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर शोध ग्रंथ लिहिला.

या शोध ग्रंथाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात वास्तव्य करणारे संदीप बाळू राठोड यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पीएच. डी. मिळवली.

याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे संदीप राठोड यांना पीएच. डी. मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, विश्वस्त अरुण पाटील (काका), प्राचार्य डॉ. आर आर जाधव, माजी प्र. प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे, उपप्राचार्य आर आर कांबळे, पर्यवेक्षक एस एस मधाळे, डॉ ए. जे. सकट व सर्व शिक्षकांनी केले.

फोटो- वेणूताई चव्हाण कॉलेज मध्ये प्रा.संदीप राठोड यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ आर. आर. जाधव, उपप्राचार्य आर आर कांबळे, डॉ ए जे सकट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here