Home महाराष्ट्र इनरव्हिल क्लब च्या वतीने भाविकांना केळी वाटप

इनरव्हिल क्लब च्या वतीने भाविकांना केळी वाटप

134

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : इनरव्हिल क्लब अंबाजोगाई च्या वतीने येथील योगेश्वरी देवी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दि. ३० सप्टेंबर रोजी प्रसाद म्हणून केळी वाटप करण्यात आली.
यावेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा संगीता नावंदर, रेखा तळणीकर, जयश्री लव्हारे, सुरेखा कचरे, जयश्री कराड, वर्षा देशमुख, सुलोचना मालवाड, मंदाकिनी साबणे या क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या. यासाठी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडिया, विश्वस्त सारंग पुजारी, सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here