Home लेख स्वतःची ओळख निर्माण करणे हाच पुरुषार्थ…’

स्वतःची ओळख निर्माण करणे हाच पुरुषार्थ…’

153

 

 

 

श्रीपाल आणि मैनासुंदरी यांच्या गोष्टीतील पुढील भागात नवपद आराधनेमुळे श्रीपालचा कुष्ठरोग दुरुस्त होतो. इतकेच नव्हे, वियोग झालेल्या आई व प्रियजनांची भेट होते. श्रीपाल स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडतो, असे प.पू. नीलेशप्रभा म.सा. यांनी आजच्या गोष्टीत सांगितले.
मैनासुंदरी आणि श्रीपाल यांनी नवपद आराधना करावी, असे मुनीराज यांनी सांगितले. आयंबिल तपही त्यांनी केले. श्रीपाल यांचा कुष्ठरोग निघून जातो. योगायोगाने श्रीपाल आणि आईची भेट होते. तो आईला नवपद आराधना आणि मैनासुंदरी यांच्यामुळे होऊ शकली, असे सांगतो. ते मुनीराज यांच्या दर्शनासाठी पोहोचतात. तिथे मैनासुंदरीची आई रूपसुंदरी यांची देखील भेट होते. तिचा मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण तिच्या सोबत दुसराच सुंदर पुरुष दिसतो. त्यामुळे कुलकलंकीनी आहे असे ती समजून घेते, परंतु खरे काय घडले ते वेगळेच असते. ती ते सविस्तर सांगते. जंगलातून जाताना मैनासुंदरी आणि पिता पद्मपाल राजा यांचीही भेट होते. ‘जैन धर्माचा कर्म सिद्धांत सुख-दुःखाला कारणीभूत असतो,’ हे राजाला पटते. पत्नी, जावई, व्याहीणबाई यांना आपल्या नगरात राजा सन्मानाने घेऊन येतो. आपण सासऱ्यांच्या नावाने ओळखले जाणे ही बाब श्रीपालला दुःखी करणारी ठरते. आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याचा श्रीपाल मनाशी निश्चय करतो. आईची आज्ञा घेऊन निघतो. ‘तू कोणत्याही परिस्थितीत नवपद आराधना सुरू ठेव. सदैव सावध रहा,’ असा मोलाचा सल्ला ती देते. मैनासुंदरी देखील सोबत येण्याची विनंती करते. ‘१२ वर्षांनी मी तुला पुन्हा भेटेल,’ असे वचन तो देतो. हे आश्वासन देऊन श्रीपाल निघून जातो. ‘तुम्ही १२ वर्षांनी ठरलेल्या वेळेत आले नाही, तर मी दीक्षा घेईल…’ असे मैनासुंदरी म्हणते. श्रीपाल स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी निघतो. वाटेत त्याला एक सिद्ध पुरुष भेटतो. त्याच्याकडे सिद्धी असते, पण त्याने स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो. श्रीपाल त्याच्यात विश्वास निर्माण करतो. प्रोत्साहनामुळे त्याची विद्या सिद्ध होते. जलतरणी व शस्त्रहरणी या दोन्ही विद्या श्रीपालला तो देतो. पुढे डोंगरावर दुसरा सिद्ध पुरुष भेटतो. त्याच्याजवळ सुवर्ण बनवण्याची विद्या असते, परंतु ती विद्या त्याला सिद्ध करता येत नाही. त्यावर श्रीपाल म्हणतो की, ‘ही विद्या माझ्यासमोर करून दाखव.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीपालच्या उपस्थितीमुळे त्याची विद्या किंवा सिद्धी यशस्वी होते, ती विद्या देखील श्रीपालला मिळते. (३० सप्टेंबर २०२५ जळगाव)

 

(शब्दांकन- किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here