Home चंद्रपूर वैश्विक ज्ञान, विज्ञान व संस्कृतीचे संवर्धन व आदान प्रदानाचे साधन से अनुवाद...

वैश्विक ज्ञान, विज्ञान व संस्कृतीचे संवर्धन व आदान प्रदानाचे साधन से अनुवाद आहे. – प्रा.डॉ.जयद्रथ जाधव

144

 

गंगाखेड: येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गंगाखेड हिंदी विभाग व भूगोल विभागाच्चा संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक भाषा अनुवाद दिन व भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मराठी साहित्यकार प्रा.डॉ.जयद्रथ जाधव, मराठी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, रेणापुर है उपस्थित होते. त्यांनी विश्व भाषा अनुवाद दिनाचे महत्व विशद करतांना म्हणाले की, “वैश्विक ज्ञान विज्ञान व संस्कृतीचे संवर्धन व आदान-प्रदान अनुवादाच्या द्वारे होते.
प्रथमत: अनुवाद प्रक्रिये विषयी माहिती दिली. मराठी भाषेला दिला गेलेला अभिजात भाषेचा दर्जा आणि त्या विषयी शासनाची भूमिका व कार्य तसेच कृति आराखडा यावर भाष्य केले. मराठी भाषेतील महत्वपूर्ण अनुवादाचे काही दाखले ही दिले. पुढे ते असे ही म्हणाले की आपल्या देशाचे प्रधानमंत्री जेंव्हा जेंव्हा जगातील वेगवेगळ्या बुद्धिस्ट देशांमध्ये जातात तेंव्हा ते असे सांगतात की, “मैं बुद्ध की भूमि से आया हूं, विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र जो डॉ बाबासाहेब आंबेडकरजीने दिया, मैं उस भूमि से आया हूं.” हे का सांतात तर या मागे बुद्ध तत्वज्ञानाचा जगात झालेला प्रचार प्रसार आहे आणि तो अनुवादाच्या माध्यमातून झाला आहे.
प्रमुख उपस्थित मा.प्राचार्य डॉ.दीनानाथ फुलवाडकर यांनी ही विश्व अनुवाद दिनाचे महत्व सांगितले. ते असे म्हणाले की, “अनुवाद प्रक्रिया ही अत्यंत जटिल असली तरी ‘स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा’ दोन्ही भाषेचे इतंभूत ज्ञान अनुवादकाला असने गरजेचे आहे.
या प्रसंगी अध्यक्षीय समापणात हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.डी.इंगोले यांनी एन.ई.पी. 2020 च्या धोरणानुसार ‘कौशल्य विकास’ अंतर्गत अनुवाद हे क्षेत्र स्वयं रोजगार उपलब्ध होण्यासाठी अत्यंत महत्वाचे साधन आहे. असे ते म्हणाले. तसेच या प्रसंगी भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष: कु.मयुरी मुंढे, सचिव कु.अम्रता भोसले यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.डॉ.दयानंद उजळंबे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. या वेळी मुख्य उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, प्रा.डॉ. कीर्तिकुमार मोरे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.संजीव कोळपे, प्रा. डॉ.एन.एस.भेंडेकर, प्रा.डॉ.हाके, प्रा.भागवत गायकवाड, प्रा.गोरखनाथ धाकपाडे, श्री रणसिग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या नियोजना साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.
धूत यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here