Home चंद्रपूर एकात्म मानव दर्शन हा संपूर्ण जीवनाचा सार आहे- बादल बेले

एकात्म मानव दर्शन हा संपूर्ण जीवनाचा सार आहे- बादल बेले

97

 

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

– शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन.

 

 

राजुरा (२९ सप्टेंबर) -शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्याने हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी “एकात्म मानव दर्शन” या विषयावर बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. बी. डोंगरवार, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून एस. जी. तुरके, गटनिदेशक, आर. एम. शेंडे, प्रभारी गटनिदेशक, एम. के. चौधरी, शिल्पनिदेशक, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव निमित्याने व्याख्याते म्हणून बोलतांना बादल बेले म्हणाले पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सर्वांमध्ये एकात्म भाव असून शरीर, मन, बुद्धी, आत्मा या व्यक्तीबद्दलच्या एकात्म संकल्पना त्यांनी जगापुढे मांडल्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरूषार्थ एकात्म असून व्यष्टी, समेष्टी, सृष्टी , परमेष्टी या सूत्राद्वारे एकात्म विश्वसृष्टीची संकल्पना सांगितली आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास, गरिबांचे कल्याण म्हणजे अंत्योदय अभिप्रेत असून एकूणच एकात्म मानव दर्शन हे संपूर्ण मानवी जीवनाचा सार आहे असे प्रतिपादन बादल बेले यांनी केले. एस. जी. तुरके गट निदेशक यांनी माहिती अधिकार दिना विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माहिती अधिकार म्हणजे काय, त्याची आवश्यकता, कसा वापर करायचा सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन. शेंडे यांनी केले तर आभार एस.पी. मद्देलवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिल्प निदेशक , कर्मचारीवृंद, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here