Home चंद्रपूर जिल्हास्तरीय शिक्षण उत्सवात ११ उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव

जिल्हास्तरीय शिक्षण उत्सवात ११ उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव

121

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

 

चंद्रपूर- जिल्हा परिषद चंद्रपूर व विनोबा शिक्षक सहाय्यता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शिक्षण उत्सव प्रिन्स सेलिब्रेशन, चंद्रपूर येथे शनिवारी (दि. २७ सप्टेंबर २०२५) अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती येथील शिक्षिका करुणा गावंडे,जांभुळकर यांना शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल गटशिक्षणाधिकारी मा.रवींद्र लहानगे, मा. मंगलाताई तोडे, मा. मनोज गौरकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम, आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यता मंच च्या विभागीय व्यवस्थापक मा. चित्रा खन्ना मॅडम, जिल्हा समन्वयक नितेश मालेकर व त्यांची चमू, तसेच सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व निवडक केंद्रप्रमुख उपस्थित होते.

उत्सवात जिल्ह्यातील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या 11 शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच काही उत्कृष्ट शाळा व केंद्रप्रमुखांचाही गौरव करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान शैक्षणिक क्षेत्रातील विविध आव्हाने व त्यावरील उपाय यावर गटचर्चा व पॅनल चर्चेद्वारे मंथन करण्यात आले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निखिल तांबोळी, नेहा उपासनी व रघुनाथ वानखेडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना जिल्ह्यातील शिक्षणाच्या उन्नतीसाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमामुळे शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जा, प्रेरणा आणि कार्याबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन देणारा हा उत्सव भविष्यातही अधिक व्यापक प्रमाणात आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here