


संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378
नागभीड : नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागभीड येथील आय. टी. आय. संस्थेचे विद्यार्थी, प्रशिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांनी गावातील स्वच्छता केली. यावेळी सरपंच यशवंत भेंडारकर, ग्रामसेविका वैशाली ढोरे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे विध्यार्थी आणी कोटगांव येथील महिलां आणी पुरुष फार मोठ्या संख्येने भाग घेवून रस्त्याच्या कडेला असलेला कचरा साफ केला. शासनाच्या सूचनेनुसार गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज पासूनच सुरु झाला. पहिल्याच दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सरपंच यशवंत भेंडारकर, सचिव वैशाली ढोरे यांनी गावाकऱ्यांचे आणी आय. टी. आय. चे विद्यार्थी आणी प्रशिक्षक यांचे आभार मानले.














