Home महाराष्ट्र नाशिक चे ग्रामदैवत नवरात्रोत्सवासाठी कालिका मंदिर ट्रस्ट सज्ज-दर्शनासाठी विशेष सेवा; परिसरात साठ...

नाशिक चे ग्रामदैवत नवरात्रोत्सवासाठी कालिका मंदिर ट्रस्ट सज्ज-दर्शनासाठी विशेष सेवा; परिसरात साठ सीसीटीव्ही कॅमेरे

154

 

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे

 

नाशिक-: नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासन व ट्रस्टचे सर्व विश्वस्त सज्ज झाले असून, भाविकांना सुखकर दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील यांनी सांगितले की, मंदिर परिसरात संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले असून दोन्ही प्रवेशद्वारांवर स्वतंत्र येणे-जाण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची
व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर संस्थानने स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभी केली आहे. महिला आणि पुरुष बाउन्सर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात येणाऱ्या सर्व भाविकांचा २ कोटी रुपयांचा सामूहिक विमा काढण्यात येणार असून, देवीच्या दागिन्यांसाठी १कोटी रुपयांचा विमा तसेच सेवेकऱ्यांसाठी विमा कवचाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार असून दररोज पहाटे ३.३० वाजता काकड आरती, रात्री १२ वाजता महाआरती होणार आहे. श्री कालिका यात्रोत्सव २२ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. स्वच्छतेसाठी १०० महिला स्वयंसेविका (बचत गटांमार्फत) आणि १०० पुरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शनासाठी स्वतंत्र महिला व पुरुष रांगांची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, मंदिर परिसरात सहाय्यता व मदत केंद्र कार्यरत राहणार आहे. याशिवाय सिव्हिल डिफेन्सचे स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस बंदोबस्त, २४ तास अग्रिशमन पथक, कर्मचारी आणि २४ तास जनरेटर सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी देणगी दर्शन अर्थात तत्काळ दर्शनाची विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नियोजन बैठकीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, विश्वस्त आबा पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे यांच्यासह मनपा स्वच्छता निरीक्षक पीयूष परमार, अग्निशमन अधिकारी दत्तात्रेय गाडे, ए. एल. कापडणीस, राजू गायकवाड, बी. बी. शेळके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here