Home चंद्रपूर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुस्तकाचे विमोचन

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुस्तकाचे विमोचन

258

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी :-साई ज्योती पब्लिकेशन नागपूर तर्फे प्रकाशित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नेवाजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे उत्साहात पार पडले. ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतीया पुस्तकाचे लेखक लक्ष्मण मेश्राम, दीपक सेमस्कर व मनोहर आंबोरकर सर असून, परीक्षार्थ्यांना अभ्यासासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ब्रम्हपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. माणिक खुणे साहेब व नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीचे मुख्याध्यापक श्री. कपूर नाईक सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ही प्रत्येक इच्छुक शिक्षकासाठी अत्यावश्यक असून, अशा प्रकारचे दर्जेदार मार्गदर्शक पुस्तक परीक्षार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी लेखकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पुस्तकाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सोपी मार्गदर्शन सामग्री उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here