


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी (केसे) यांच्यावतीने कराड पंचायत समितीतील शिपाई शोभाताई चव्हाण यांचा सेवानिवृत्ती पण सत्कार करण्यात आला.
शोभाताई चव्हाण ह्या पंचायत समितीतील शिपाई प्रदीर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट 2025 सेवानिवृत्त झाल्या. त्याबद्दल कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांच्या हस्ते,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते आणि शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, पाडळी (केसे) ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, संपतराव मोहिते, आदर्शमाता प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष दीपक मोहिते सह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.













