Home महाराष्ट्र धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात-पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल...

धरणगांव नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहात-पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड

200

 

 

धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर

धरणगाव – नगर परिषदेचा १५९ वा वर्धापन दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या औचित्याने नगर परिषदेमार्फत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत तब्बल १५९ वृक्षांची लागवड करण्यात आली.

या विशेष उपक्रमावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे, विद्युत अभियंता राहुल तळले, बांधकाम अभियंता निलेश तमखाने, कर प्रशासन अधिकारी मंगेश लंके तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास चालना मिळणार असून पर्यावरण संवर्धनाचा एक स्तुत्य संदेश समाजात पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here