


खटाव प्रतिनिधी: नितीन राजे.
गणपती म्हणजे कला आणि बुद्धीची देवता, बाप्पांचे आगमन झाल्यानंतर देखावा हा त्यातील एक अविभाज्य घटक कोण काय करेल हे काय सांगता येत नाही. असाच देखावा केला आहे खटाव तालुक्यातील सुयश थोरात यांनी संपूर्ण बैलगाडी शर्यतच घरातच भरून टाकली.
खटाव तालुक्यातील राहती गावातील कराड येथे वाणिज्य शाखेत शिकणारा शेतकरी कुटुंबातील सुयश गणपतीची आगमन झाल्यानंतर आपल्या घरातील गणपतीपुळे चक्क ब्लॉगर केसरी मैदान होगी हो घरातच साकारले आहे त्यामुळे पंचक्रोशी त्याची बरीचशी चर्चा होत आहे.
शेतकरी कुटुंबातील सुयश यांच्या घरी कोणताही पाळणारा बैल नाही. परंतु ब्लॉक बनवण्याचा छंद असल्यामुळे व किरकोळ एकदम रील त्यांनी बैलगाडी मैदानात जाऊन केल्या आणि त्याची ओळख बैलगाडी क्षेत्रात ब्लॉगर म्हणून निर्माण झाली. ज्या क्षेत्राने आपल्याला ओळख दिली ते क्षेत्रच बप्पांचीपुरतीने साकारण्याचा एक छोटासा परंतु यशस्वी प्रयत्न केला.
हे करत असताना कोणताही ब्रँडेड मोठा मोबाईल नाही, कुठलाही सेटअप नाही तर आहे त्या मोबाईलवर कुटुंबियांनी व मित्रांनी त्याला मदत करत त्याची बैलगाडी क्षेत्रात ब्लॉगर म्हणून चांगलेच ओळख निर्माण झाली त्यामुळे आज प्रत्येक आरतीला बैलगाडी क्षेत्रातील नामांकित बैलगाडा मालक असतील चालक असतील आवर्जून गणपतीच्या आरतीसाठी घरी येत असतात.
बैलगाडीच्या धावण्यासाठी लागणाऱ्या फाट्या, मंडप बैलगाडी आणण्यासाठी लागणारे टेम्पो, बैल भरण्यासाठी चा जमाव , नाश्त्यासाठीची टेम्पोची हॉटेल सुट्टी मेकर, झेंडा पंच, निकाली पंच, समालोचक ते अगदी बक्षीस वितरणापर्यंत सर्व लहान लहान गोष्टींचा विचार करून बैलगाडी शर्यत यशस्वी करणाऱ्या लोकांनी भरभरून शुभेच्छा देऊन व कौतुक करत आहेत.














