Home लेख आदर्श नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व

आदर्श नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व

271

 

 

 

ऐतिहासिक पौराणिक महात्म्य जपून असलेल्या अचलपूर नगरीतील नशीबपुऱ्याचे प्रतिनिधित्व नगर परिषदेत करून या पुऱ्याचे नशीब पालटवून टाकणारे, लोकांच्या कल्याणासाठी अर्थात गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले माझे वडील कै.बाबारावजी
वायलाजी बुंदेले यांचा आज चोविसावा स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांना माझे विनम्र अभिवादन ॥
त्यांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या जुन्या स्मृतींना व कार्याला उजाळा देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.
नगरसेवक म्हणून १९६० ते १९८० पर्यंत बाबांनी केलेली विकासाची कामे लोकांना दिलेला जिव्हाळा,प्रेम याला तोड नाही.लोकांच्या कामांसाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले .” सामर्थ्य आहे संघर्षाचे।जो जे करील तयांचे परंतु तिथे निरहंकाराचे ।अधिष्ठान पाहिजे ॥ ” याप्रमाणे त्यांचे वर्तन होते.त्यांच्या कार्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. जगात स्वत:साठी जगणारे अनेक असतात मात्र जो स्वतःचा संसार सांभाळून दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा समाजसेवक असतो.बाबा हे असेच एक व्यक्तिमत्व होते.जनसेवक, जनताभिमुख,जनकल्याणासाठी झटणारे,निर्गवी,निलोंभी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले आदर्श नगरसेवक
कै.बाबारावजी बुंदेले यांची भारतीय स्वातंत्र्याच्या ५४ व्या वर्धापन दिनी म्हणजे दि.१५ ऑगस्ट २००१ ला प्राणज्योत विझली .” स्वातंत्र्याचे झेंडे फळकत होते।उंच उंच डौलात डोलत होते। स्वातंत्रदिनी निघून गेले।मंगल दिनी स्मृती ठेऊन गेले॥”एक गरिबाचे सेवक, निराधारांचे आधार आपल्यातून निघून गेले तेव्हा सर्वच अचलपूरवासी हळहळले.बाबा नगरसेवक पदावर कार्यरत असताना जी सेवा दिली त्याला तोड नाही.नगरवासीयांची कोणतीही अडचण असो ती सोडवण्यासाठी ते प्रयत्नरत असत.लोकसेवेचा त्यांनी कधीच कंटाळा केला नाही किंवा अहंकार अंगी बाळगला नाही; कारण त्यांना हे माहिती होते की, अहंकार माणसाला प्रथम खुलवितो व नंतर गिळंकृत करतो.समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे ते प्रेमाणे,आपुलकीने, जिव्हाळ्याने बोलत व वागत असत.त्यांची अडचण समजावून घेत व ती सोडविण्याचा प्रयत्न करीत.अचलपूरवाशीयांना बाबांच्या या गोड स्मृती नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या चांगल्या कार्यातून सर्वसामान्यांना प्रेरणा मिळावी असे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व होते.
जगात दोन प्रकारचे लोकं असतात. एक म्हणजे स्वतःच्या संसाराचा सांभाळ करणारे आणि दूसरे असे असतात की, स्वतःच्या संसारासोबतच इतरांचे ही संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविणारे व त्यानुसार सेवा कार्य करणारे.माझे वडील हे दुसऱ्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला वाचवणारे समाजसेवक होते.अशा कहाण्या तत्कालीन काळात माझ्या आई – बाबांनी ज्यांना मदत केली त्यांची मुलं आम्हाला सांगतात. “स्वतःसाठी जनता जगता ।दुसऱ्यासाठी जगून बघाचे।
दुसऱ्यांचे होऊन दाता। मनापासून त्यांचे व्हावे ॥”
असे व्यक्तिमत्व बाबांचे होते.
स्वतःचे पाच मुलं व तीन मुलींचा योग्य प्रकारे सांभाळ करून स्वतःच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत व इतर जी लोक सेवा केली ती फार मोलाची आहे .त्यांची अर्धांगिनी समाजसेविका कै.
मैनाबाईंचाही बाबांच्या कार्यात खूप मोठा वाटा होता;कारण कार्यकर्ता माणूस तेव्हाच कार्य करू शकतो, जनसेवा करू शकतो जेव्हा त्याला त्याच्या अर्धांगिनीची साथ असेल अशाच सेवावृत्तीचे व्यक्तिमत्व माझ्या मातोश्रीचे होते. त्यांनी आपल्या संसारी कुटुंबात आपल्या पाल्यांना व नातवांना इंजिनिअर मुख्याध्यापक,प्राध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक,ड्रॉक्टर होताना बघितले.त्यांचे थोरले चिरंजीव भगवंतराव आज एपीआय पदावरून सेवानिवृत्त झाले. कै.रमेशराव वनविभागात होते.श्री गणेशराव व श्री मोहनराव यांनी स्वतःची शेती सांभाळून मुलांना घडविले . आज त्यांची मुलं व मुली पुण्याला कंपनीमध्ये अधिकारी आहेत. मी धाकटा चिरंजीव प्रा.अरुण श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती येथून पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झालो आणि माझ्या आई-वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा माझ्या सामाजिक व शैक्षणिक अशा विविध प्रबोधन मालेतून, भाषणातून,लेखातून,कवितेतून अभंगातून विविध विषयावर प्रकाशित केलेल्या अकरा पुस्तकातून पुढे नेण्याचा प्रयास करीत आहे. त्यात ” निखारा ” व “अभंग तरंग ” हे दोन काव्यसंग्रह “आदर्श अभ्यासाचे तंत्र” व “आदर्श मार्गदर्शिका” ही शैक्षणिक पुस्तके आणि इतर सामाजिक विषयावरील पुस्तके प्रकाशित करून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करीत आहे. तसेच मी आई-बाबांच्या नावाने कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून त्याद्वारे विविध शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती परितोषिक व कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले स्मृती पारितोषिक त्या शाळांना आई-वडिलांच्या नावाने दिलेल्या देणगीच्या व्याजातून त्या शाळेतील वर्ग दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन पंधरा ऑगस्टला बाबांच्या स्मृतिदिनी अर्थात स्वातंत्र्यदिनी सन्मान करून बाबांना दरवर्षी आदरांजली अर्पण करीत असतो.
कै.बाबारावजी बुंदेले यांचे थोरले सुपुत्र श्री भगवंतराव हे A.P. I. पदावरू सेवानिवृत्त झाले असून त्यांची धोरली कन्या सौ.ज्योती कमलाकर चापके (नात ) ही ब B.A.,B.Ed .असून आर्वी येथे शिक्षिका आहे.द्वितीय कन्या सौ. दिपाली ओमप्रकाश राखोंडे (नात) ही B.A., B.Ed.,M.A. (Marathi ), M.A. (Soc) मध्ये ती मेरीट आली होती.आज ती नेट सेट व पीएच डी.ची तयारी करीत आहे. तृतीय कन्या सौ. विद्या राजेंद्र वानरे (नात) ही B.A.,B.Ed., M.A.(Mar), M.Ed., असून नागपूर येथे सहा.शिक्षिका आहे.धाकटी कन्या सौ.मेघा सचिनराव सातपुते (नात) ही B.Sc. झालेली आहे.
कै.बाबारावजी बुंदेले यांचे द्वितीय सुपुत्र कै.रमेशराव हे वनविभागाव कार्यरत होते. त्यांचा थोरला सुपुत्र श्री सचिन (नातू) M.B.A.आहे. धाकटा सुपुत्र श्री विपिन (नातू) हा B.Sc. कृषी, M.A.(Soc) असून अमरावतीला वनविभागात कार्यरत आहे.
कै.बाबारावजी बुंदेले यांचे तृतीय सुपुत्र श्री गणेशराव बुंदेले परतवाडा येथे आदर्श शेतकरी असून त्यांची थोरली कन्या कु. रुपाली प्रवीणराव किटे (नात) ही B.Sc., B.Ed. M.B.A. असून ती हरवाडे कन्स्ट्रक्शन कंपनीत पुण्याला एच.आर.पदावर कार्यरत आहे. धाकटी कन्या सौ. दीपली मनोजराव नासणे (नात) ही B. Sc., B.Ed., M.Ed. असून मराठी विषयात Ph.D. (मराठी) सुरु आहे आणि अंजनगाव सूर्जी (हिरापूर) येथे सहा. शिक्षिका आहे. धाकटा सुपुत्र श्री मंगेश (नातू) हा B.E.,M.E. असून पुणे येथील कंपनीत Sr.Engineer आहे .
कै. बाबारावजी बुंदेले यांची थोरली कन्या कै. कमलाबाई यशवंतराव शेकोकर प्राचार्य म्हणून राळेगाव येथून सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांचा थोरला सुपुत्र श्री जयंत (नातू) M.E. असून सी.पी.डब्ल्यू डी. मध्ये मुंबईला वर्ग १ चा अधिकारी आहे. श्री संजय (नातू) B.E., M.B.A. असून पुणे येथील भारत फोर्स कंपनीमध्ये Senior Manager आहे. कन्या सौ.नलिनी अशोकराव जोनवाल ही M.A. ( Soc, Pol. sci., Dr.B.R. Ambedkar Thought), B.Ed. असून नागपूरच्या अन्नपूर्णाबाई देशमुख कला व वाणिज्य क.म.वि.मध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापिका आहे.
कै.बाबुरावजी बुंदेले यांची मधली कन्या कै.शशिकला
महादेवराव मांगे हिचे थोरले सुपुत्र प्रा.रविकिरण.(नातू) हा M.A.(Soc, His), B.Ed., M.Ed.असून अनसिंग येथील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक आहे. धाकटा सुपुत्र श्री विनोद (नातू) B.A.,D.Ed. असून अचलपूर येथील शहापूर येथे मुख्याध्यापक आहे.धाकटी मुलगी सौ. संजीवनी प्रशांतराव काकडे (नात) ही M.A., B.Ed., M.Phil. असून Ph.D. करीत आहे .
कै.बाबारावजी बुंदेले यांचा चतुर्थ पुत्र मी प्रा.अरुण माझा थोरला सुपुत्र M.B.A. (IIM Kolkutta) असून तो बंगलोर येथील कंपनीमध्ये Product Manager पदावर कार्यरत आहे तर धाकटा सुपुत्र चि.साकेत (नातू) हा B.E.(MIT, Pune) असून MBA – Banglor येथे झाले आहे. तो पुणे येथील कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्यांचा धाकटा पुत्र श्री मोहनराव यांची कन्या कु सपना (नात) ही B.B.A. आहे. व चि. स्वप्निल (नातू) आहे.
कै .बाबारावजी बुंदेले यांची धाकटी कन्या सौ.लता प्रभाकरराव इंगळे हिचा थोरला सुपुत्र श्री राहुल (नातू) B.E., MBA. असून मुंबईच्या J.S.W. या इंडस्ट्रीजमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर धाकटा पुत्र डॉ.शरद (नातू हा M.B.B.S., D.N.B., D.GO. (KEN. Mumbai) F.R.M. (Fellowship In Diploma in Reproductive Medi-Reproductive Medicine),D.R.M. हे शिक्षण घेऊन Samartha Fertility
And Fetal Medicine Centre,Subhash Nagar Nagpur येथील स्वतःच्या दवाखान्यातून स्त्रीरोग, भ्रूण चिकित्सा वंध्यत्व उपचार (स्त्री-पुरुष ),उन्नत स्त्रीरोग लेप्रोस्कोपी, टेस्ट ट्यूब बेबी इत्यादी सेवा रोग्यांना देत आहे. मुलगी सौ.सारिका नितीन सातपुते (नात) ही B.A., A.T. D. झालेली असून तिचे अकोला येथे Drawing classes सुरु आहे.त्याचप्रमाणे त्यांचे पाचही मुलं आणि तीन मुली त्यांचे मुलं म्हणजे नातू हे त्यांच्या सेवाकार्यातून आणि विविध प्रकारचे समाजकार्य करून त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आज माझ्या बाबांना कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले यांच्या दि.१५ ऑगस्ट २०२५ ला असलेल्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा ॥

 

प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती : ८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here