


*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : अनुभव शिक्षा केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा, बाबा पेट्रोलियम, कोरेगांव, डी पी भोसले कॉलेज, कोरेगांव यांच्या संयुक्तरित्या, “आंतरराष्ट्रीय युवक दिन” डी पी भोसले कॉलेज, कोरेगाव उत्साहात साजरा करणेत आला .
या दिना निमित्त, ” युवक आणि उद्योजकता” या विषयावरती मार्गदर्शन सत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या सत्राच्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक, श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा), यशस्वी उद्योजक म्हणून अनुभव मांडण्यासाठी श्री निखिल रमेश कांबळे (मालक – बाबा पेट्रोल पंप, किन्हई, कोरेगांव) यांनी उपस्थित राहून युवकांचे मनोधैर्य उंचावले होते.
कार्यक्रमाच्या सत्राची सुरुवात श्री सिद्धार्थ खरात यांनी प्रास्ताविक करून केली. या मध्ये युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी “अनुभव शिक्षा केंद्र” महाराष्ट्रात काम करत असल्याने नमूद केले. त्या सोबत आजचा युवक हा उद्याचा समाज व देशाच्या तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असणे गरजेचा आहे हे मांडले.
त्यानंतर श्री दंडगव्हाळ सरांनी भारतातील युवक आणि चीन, अमेरिका, युरोप मधील युवकांचे डिजिटल युगामधील संबंध मांडून आपण उद्योजकीय व्यवहार आत्मसात करावे. त्या सोबत आपली सांस्कृतिक जीवनशैली ही आपला जगाशी जोडलेला महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे आपण विकसनशील राष्ट्रात मोडले जात असल्याने, आपल्या देशात जास्त आर्थिक गुणवणुकीत होत असल्याने आपण त्याचा विकासासाठी फायदा घेतला पाहिजे. महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, कौशल्य आणि उद्योजकता बाबत तरुणांच्या सोबत काम करण्यास बांधील आहे. दोन पावले तरुणांनी आणि आठ पावले शासन पुढे घेऊन जाण्यास तयार आहे. तरुणांच्या मनातील कल्पना शक्ती अफाट असल्याने त्यांनी त्या प्रत्यक्षात उतरवणून, स्वतःला उद्योजक म्हणून सिद्ध करण्यास, “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” ही योजना आपल्याला आर्थिक विकास करण्यासाठी साथ देण्यास तयार आहे, या बाबत त्यांनी लक्ष वेधले.
श्री निखिल कांबळे यांनी स्वतःचा भारत पेट्रोलियम, सोबत डीलर म्हणून जोडून असणारा बाबा पेट्रोलपंप निर्माण करतानाचा अथक प्रवास मांडला. एकूण 32 न हरकत आणि परवानग्या घेऊन त्यांनी मुंबई ते ग्रामीण उद्योजक केलेला प्रवास आज यशाची प्रतिमा देणारा आहे. ग्रामीण भागात आर्थिक उन्नती देणारा पेट्रोल पंप चालविणे माझ्यासाठी एक मॉडेल तयार झाले आहे. हे मॉडेल मी ज्यांना पेट्रोल उद्योगात यायचे आहे, त्यांना मी शिकविण्यास तयार असल्याने सांगितले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, प्राचार्य श्री एल डी कदम, डी पी भोसले कॉलेज, यांनी माझ्या कॉलेज मध्ये 11 वी ते एम एस सी, तसेच बी सी ए या कोर्सेस मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या पुढे कॉलेज च्या उद्योजकता विभागात सुद्धा प्रवेश घेऊन एक महिना उद्योजक विषय प्रकल्प निर्माण करण्यास पुढील वर्षापासून देणार आहेत, असे स्पष्ट केले. त्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 2 दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम या कार्यशाळे घेण्यास उद्योग विभाग, अनुभव शिक्षा केंद्र यांनी वेळ द्यावा, ही विनंती केली. त्यासाठी श्री दंडगव्हाळ आणि खरात यांनी होकार देताच उपस्थित विद्यार्थी मित्रांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक आघाडीचे गुजरवाडी जिल्हा परिषदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री धनसिंग सोनवणे सर यांनी सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या विचाराची आत्ता च्या काळात गरज असल्याचे सांगून, त्यामुळे विद्यार्थी बाल वयात स्वावलंबी होतात हे सांगितले. त्यातूनच नव्या भारताचे युवा उद्योजक घडतात हे मत मांडले.
या कार्यक्रम नियोजनाची जबाबदारी, NSS विभाग, कॉलेज मधील उद्योजक विभाग आणि कॉमर्स विभाग यांनी यशस्वी रीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार NSS विभाग प्रमुख यांनी मानले.














