Home महाराष्ट्र आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच जयदीप शिंदे यांनी स्वीकारलं पालकत्व

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच जयदीप शिंदे यांनी स्वीकारलं पालकत्व

346

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला त्या महात्मा फुलें यांचा कटगून गावातील महात्मा फुले आश्रम शाळेतील 200 गरजू होतकरू विद्यार्थ्यांची आज सामाजिक कार्यकर्ते जयदीप शिंदे यांनी भेट घेतली,त्यांना सध्यस्थीती मध्ये असणाऱ्या शैक्षणिक अडचणी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली व आश्रमातील विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक अडचणी सोडवन्याचे प्रतिपादन जयदीप शिंदे यांनी केले
आश्रमात शिकत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे पालक या जगात हयात नाहीत,मराठावाडा, विदर्भ,खटाव या दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थी या आश्रमशाळेत शिकत आहेत विद्यार्थ्यांची परस्थिती हलाखीच्या आहे त्यांना मदत करणे ही काळाची गरज आहे,शिक्षणच त्यांना यातून तारू शकते,प्रत्येक गरजू होतकरू विद्यार्थ्यांला प्राथमिक शिक्षण घेता आल पाहिजे हा उदात्त हेतू समोर ठेऊन या 200 ही विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत व ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत त्यांचं कायमच पालकत्व आज जयदीप शिंदे यांनी स्वीकारलं या महिन्यात या सर्व विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक अडचणी सोडवण्याचा विश्वास येथील मुख्याध्यापकांना दिला.आज पासून येथील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे त्या निमित्ताने आश्रम शाळेतील 200 ही विद्यार्थ्यांना 200 बॉलपेन चे वाटप जयदीप शिंदे यांच्या कडून करण्यात आले
या प्रसंगी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार जगताप, महिला अधीक्षक सीमा माने, प्रकाश गायकवाड उपस्थित होते

विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाआपलेपणाची जाणीव झाली,9 वि मधील एक विद्यार्थिनी संवाद झाल्यावर बोलली “दादा तुम्ही सारखे सारखे शाळेत या ,आमच्या घरच कोणी तरी भेटायला आल्यासारखं वाटत आहे,तुम्ही घरच्या सारखी विचारपूस करत आहात याचा आनंद झाला”.
खर तर शैक्षणिक मदती सोबत आपुलकीचे दोन शब्द ही या विद्यार्थ्यांना आनंद देतात.जमेल त्यांनी या आश्रमात जाऊन भेट नक्की द्या,समाधान मिळेल,31 ऑगस्ट च्या अगोदर या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य( बॅग वह्या कंपास पुस्तके) दिले जाणार आहे महात्मा फुलेंच्या पुण्यभूमीत शैक्षणिक मदत करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असे जयदीप शिंदे यांनी म्हटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here