Home यवतमाळ पिंपरड येथील खदानीतील ब्लास्टींगमुळे घरांना तडे तहसिलदारांकडे निवेदनातून नुकसान भरपाईची मागणी

पिंपरड येथील खदानीतील ब्लास्टींगमुळे घरांना तडे तहसिलदारांकडे निवेदनातून नुकसान भरपाईची मागणी

126

 

सुनील शिरपुरे/यवतमाळ

झरीजामणी:मुकुटबन या छोट्या शहरालगत असलेल्या पिंपरड शिवारात खदानीतील ब्लास्टींगमुळे घरांना दररोज प्रचंड हादरे बसतात. पिंपरड गावातील नागरिक भयभीत झाले आहे. या ब्लास्टींगमुळे भविष्यात विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. मुकुटबनपासून काही अंतरावर असलेल्या पिंपरड परिसरात मोठ्या प्रमाणात खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात आर.सी.पी.एल या कंपनीने याच परिसरात प्लांट सुरु केला आहे. याठिकाणी प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे. प्रचंड प्रमाणात होणा-या ब्लास्टमुळे येथील घरांना जोरदार हादरे बसतात. त्यामुळे अनेक घरांना तडे गेले. स्फोटाच्या आवाजाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होत आहे. या प्रचंड प्रमाणातील स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात घरांना हादरे बसले. त्यामुळे घरांना तडे गेले आहेत. दररोज होणा-या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. खदानीत संबंधित कंपनी दररोज ब्लास्ट करतात. या ब्लास्टच्या स्फोटामुळे प्रचंड आवाज होतो आणि मोठा हादरा बसतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पिंपरड येथील नागरिक भयभीत झाले आहे. त्यांना अनर्थ घडण्याची चिंता सतावत आहे. घरांना तडे जात असल्याने घरे पडण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने पिंपरड येथील नागरिकांनी तहसिलदारांना निवेदन देऊन सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर यावर तहसिलदांरांकडून संबंधित कंपनीची चौकशी करून ब्लॉस्टींगवर लगाम लावतील का? नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळतील का? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here