Home महाराष्ट्र बाबासाहेब कांबळे यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन

बाबासाहेब कांबळे यांचे मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन

276

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
गंगाखेड तालुक्यातील चिलगरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती विकास कामात मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार झाल्याचा आरोप येथील रहिवासी तथा रिपाई आठवले गटाचे तालुका संघटक बाबासाहेब कांबळे यांनी केला आहे.अपहार करणाऱ्या ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी दिनांक 7 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे दिनांक 15 जुलै मंगळवार पासून मुंबई येथील आझाद मैदानावर कांबळे धरणे आंदोलनास बसले आहेत.
गंगाखेड तालुक्यातील चिलगरवाडी ग्रामपंचायत
अंतर्गत 2024-25 वर्षामध्ये दलित वस्ती रमाई नगर विद्युतीकरण कामांमध्ये मोठ्या स्वरूपात भ्रष्टाचार झाला गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर नगर नावाची वस्ती असताना दुसरी रमाई नगर अशी खोटी वस्ती दाखऊन येथील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी संगणमत करून कागदपत्रे व खोटी लोकसंख्या दाखवून मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.या अगोदर गंगाखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी, जिल्हाधिकारी,तथा राज्याचे सचिव यांना चौकशी करण्याचे पत्र दिले परंतु कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही म्हणून मला न्यायासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करावे लागत असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
शासनातर्फे दलित वस्ती विकास कामासाठी लाखो रुपयांचा निधी येतो परंतु ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी मिळून गावातील दलित समाजाच्या वस्तीतील नागरिकांमध्ये कारभारी व गावगुंड दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याने कोणीही तक्रार किंवा आवाज उठवायला तयार नाही याचा फायदा घेऊन सदर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगणमत करून खोटे कागदपत्रे तयार करून योजनेच्या नावाखाली बोगस बिले उचलून आलेला निधी लाटण्याचे काम केले आहे संबंधित ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा धरणे आंदोलन सुरूच राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर बाबासाहेब कांबळे यांची स्वाक्षरी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here