Home चंद्रपूर शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी वैभव बोनगीरवार रूजू

शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी वैभव बोनगीरवार रूजू

164

 

चंद्रपूर (प्रतिनिधी) :
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. वैभव बोनगीरवार हे आता
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून काल दि. २६ जून रोजी रूजू झाले आहे. संस्थेतील स्टाफ च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्री. बोनगीरवार यांनी यापूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य म्हणून उत्तम काम केले आहे. व्यवसाय प्रशिक्षण, व्यवस्थापन संदर्भातील मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी असून प्राचार्य पदांची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी संस्थेच्या प्रशिक्षण कार्यास गती दिली आहे. संस्था विकासाबाबत त्यांनी आराखडा तयार केला असून लवकरच त्या दृष्टीने ते गती देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here