Home महाराष्ट्र “शाळा प्रवेशोत्सव २०२५” निमित्त मंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थितीत वीरकरवाडी येथे विध्यार्थ्यांचे...

“शाळा प्रवेशोत्सव २०२५” निमित्त मंत्री जयकुमार गोरे यांचे उपस्थितीत वीरकरवाडी येथे विध्यार्थ्यांचे स्वागत

200

*सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड मोबा. 9075686100*

 

 

म्हसवड /सातारा : शालेय जीवनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात आनंद साठवणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असा “शाळा प्रवेशोत्सव २०२५” आज राज्यभरात साजरा करण्यात आला. याच अनुषंगाने आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वीरकरवाडी, ता. माण, जि. सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढली व विद्यार्थ्यांचे खास स्वागत करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ना.मा.श्री.जयकुमार गोरे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देत मुलांचा पहिला दिवस खास करण्यासाठी सहभाग घेतला यावेळी त्यांचे पारंपारिक लेझीम व गजीनृत्याने स्वागत केले.

आजच्या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट व गजिनृत्य, शाळा परिसरात ऐक पेड माँ के नाम या माध्यमातून वृक्षारोपण केले.

याप्रसंगी ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात त्यामध्ये पोषण आहार योजना मोफत पाठ्यपुस्तक योजना या सर्व योजना गोरगरिब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांचा गुणात्मक विकास करा.राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, पाठ्यपुस्तकं, गणवेश, आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शासन शिक्षणावर भरघोस खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेतली जात आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद, नवीन वर्ग, नवीन पुस्तकं आणि स्वागताच्या गोड आठवणी यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

या कार्यक्रमास माण तालुकाअध्यक्ष प्रशांत गोरड , युवानेते लुनेश विरकर, लाडकी बहीण योजनेचे माण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे ,अल्पसंख्यांक आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष अकील काझी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब,पंचायत समिती, माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे,माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,केंद्रप्रमुख पतंगे साहेब,शालेय स्थापन समितीचे अध्यक्ष विशाल विरकर, सर्व सदस्य, मुख्याध्यापक तोरणे मॅडम,किरण बोराटे सर,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या आठवणीत रेखाटले जाणारे सुंदर क्षण ठरले असून त्यांच्या शालेय जीवनात उभारी देणारे ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here