Home महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळा आंधळी येथील शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सव मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

जिल्हा परिषद शाळा आंधळी येथील शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सव मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संम्पन्न

99

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड ) मोबा. 9075686100*

 

म्हसवड /सातारा : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री जयकुमार गोरे यांनी आज नव्या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त आंधळी, ता. माण, जि. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेत २०२५/२६ साठी नवीन प्रवेशोत्सव करणाऱ्या नवगतांचे, विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध रंगी रांगोळ्या, सरपंच, पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचा सहभाग, शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षरोपण शाळेच्या पहिल्या दिवशी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली शाळेच्या दारात उभारलेली गुढी असे शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.शाळेचा पहिला दिवस साजरा करताना मुलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थी संख्या, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने राबविण्यात येणारे उपक्रम, तसेच शाळेतील एकूण शैक्षणिक वातावरण यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला व शिक्षण क्षेत्रातील सुधारणा व सर्वसमावेशक प्रगतीसाठी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थांसोबत ना.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी यांनी संवाद साधला.

यावेळी मा.जि.प.सदस्य मा.श्री.अर्जुन (तात्या)काळे,मा.जि.प.सदस्य,मा.श्री .डी. एस काळे (भाऊ),आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच मा.श्री.दादासाहेब काळे,मा श्री संतोष काळे, जि.प.सातारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद,
कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि. प.सातारा अमर नलावडे, जि. प.सातारा शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी,पंचायत समिती, माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण विजयकुमार कोकरे, पंचायत समिती, माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख, केंद्र -आंधळी साधना झणझणे ,मुख्याध्यापक घनशाम काळे, उपशिक्षक सुप्रिया चिरमे,माया वरकड ,विजय गोरे,पल्लवी गोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here