Home चंद्रपूर विदर्भातील शाळा २३ जूनला हा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान?

विदर्भातील शाळा २३ जूनला हा उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान?

269

चिमूर,
विदर्भातील माध्यमिक शाळा दि.२३ जून २०२५ ला सुरू कराव्या असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पञ आहे.त्यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सुट्ट्यांचे परिपञक काढले तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा दि.२६ जून २०२५ ला सुरू होणार अशी तारीख नमूद केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष माजी आमदार नागो गाणार यांनी पञ पाठविले आहे.यापूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णय विदर्भातील शाळा दि.२६ जूनपासून सुरू करण्याचा आहे.असे असताना दि.२३ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाचा अवमान ठरत नाही का? चंद्रपूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी दि.२३ जुनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढण्याचे वर्तमानपञातून सांगितले आहे.दि.२३ जूनपासून शाळा सुरू करणे हा उच्च न्यायालयाचा अवमान ठरतो.तरी विदर्भातील शाळा दि.२६ जून २०२५ पासून सुरू कराव्या असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here