Home चंद्रपूर चिमूर तालुका शिक्षक परिषदेची कार्यकारिणी

चिमूर तालुका शिक्षक परिषदेची कार्यकारिणी

235

 

 

चिमूर,- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याची बैठक संत जगन्नाथ मठ चिमूर येथे नुकतीच संपन्न झाली. या बॆठकीला नागपूर विभागाचे उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विलास खोंड, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मोहितकर, कार्याध्यक्ष मुस्तकीम पठाण, सहकार्यवाह विलास वरभे व चिमूर तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चिमूर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले, ते पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रमोद धारणे, कार्यवाह परमानंद बोरकर, उपाध्यक्ष सौ. शिल्पा ढाकुणकर, सुधीर सुकारे, सहकार्यवाह कबीर कुमरे, सौ.शिल्पा डोंगरवार, कोषाध्यक्ष प्रभाकर समर्थ, कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे, हरिश्चंद्र हटवार, नरहरी कापसे, महिला आघाडी प्रमुख कु. शितल पिसे, सह महिला आघाडी प्रमुख सौ. वैष्णवी बोढे, संघटनमंञी सुरेश चौधरी, प्रसिद्धी प्रमुख शेलेश वाघे, कार्यालयमंञी विकास हटवादे, सदस्य हिराजी खाटीक, नितीन पेंदोर इ.ची सर्वानुमते निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here