Home चंद्रपूर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्याने ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे आदर्श...

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्याने ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न

263

 

 

चिमूर- महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्याने ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्रचे उद्धाटन सरपंच साईश सतीश वारजूकर यांच्या हस्ते व नितीन फुलझेले (गट विकास अधिकारी, पं.स.चिमूर), अशोक शामकुळे (सहा.गट विकास अधिकारी, पं.स.चिमूर), अरविंद उघडे (विस्तार अधिकारी (पंचा.) पं. स. चिमूर), यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
ग्राम पंचायत ने सुरु केलेल्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत गावातील नागरिकांना शासकीय, निमशासकीय व व्यवसायिक स्तरावरच्या सर्व सेवा या गावातच उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमाला शहीद शेख (BM ASSK, पं. स.चिमूर), अशोक चौधरी (उपसरपंच , ग्राम पंचायत शंकरपूर ), नितीन सावरकर (सदस्य, ग्रा. प. शंकरपूर), सौ.सविताताई चौधरी (सदस्य, ग्रा. प. शंकरपूर), निखील गायकवाड (सदस्य,ग्रा.प.शंकरपूर), सौ.गीताताई रानडे (सदस्य, ग्रा. प. शंकरपूर) तसेच श्री. केशव गजभे (ग्राम पंचायत अधिकारी) आदी मान्यवर आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here