


अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड:-
शहरातील मातोश्री मोबाईल शॉपी दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला शिवीगाळ करून अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी केला.सदरील घटनेचा गंगाखेड व्यापारी महासंघाच्या वतीने त्रिव निषेध व्यक्त करत त्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे या मागणीचे निवेदन (दिनांक 5 एप्रिल शनिवार) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना दिले आहे.
अधिक माहिती अशी की दिनांक 1 एप्रिल रोजी शहरातील मुख्य मार्गावरील असलेले मातोश्री मोबाईल शॉपी येथे काही युवकांनी एकत्र येत मोबाईल खराब झाल्याचे कारण सांगून दुकानाची तोडफोड केली दुकान मालकाच्या व त्यांच्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला सदरील घटनेतील आरोपींवर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात आले नाही अशा गुंड प्रवर्तीच्या युवकांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गुंड प्रवृत्तीच्या युवकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे आरोपीना अटक न झाल्यास येत्या 8 एप्रिल मंगळवार रोजी गंगाखेड बाजारपेठ बंद करण्याचा इशाराही गंगाखेड व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमानी,मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन नाव्हेकर,बळीराम चौरे, नितीन बचाटे यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव व महासंघाचे सर्व सदस्य उपस्थित होते














