Home महाराष्ट्र पुनर्वसित गावांसाठी सर्व ती मदत केली जाईल : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...

पुनर्वसित गावांसाठी सर्व ती मदत केली जाईल : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही कृषी पर्यटन केंद्र चिंचणीस बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधवपाटील यांची भेट

96

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

पुनर्वसित गावांसाठी सर्व ती मदत केली जाईल : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही

कृषी पर्यटन केंद्र चिंचणीस बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधवपाटील यांची भेट

म्हसवड /सातारा : चिंचणी या पुनर्वसित गावाने पर्यटनाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे, गावातील पर्यटन महिलाच्या पुढाकाराने केले. गावासाठी आवश्यकती मदत करू, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आम्ही मिळून पुनर्वसित गावांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

पुनर्वसन ग्रामपंचायत चिंचणी ( ता. पंढरपूर ) येथे शनिवारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सुभाष देशमुख, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे , मोहन अनपट यांच्यासह मान्यावर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गावात फिरून पर्यटन विषयक कामाची पाहणी केली. तसेच पर्यटन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गावातील महिलांना प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, चिंचणी हे सातारा तालुक्यातील गाव असून, चिंचणी गावाने भाऊसाहेब.महाराज यांचा पुतळा बसवला, एवढे प्रेम गावाने केले.
पुनर्वसित गाव म्हटले की अनेक अडचणी असतात, नवीन ठिकाणी जाऊन बसताना हाल होतात, कधी चांगले अधिकारी मिळतात, कधी अडचणी वाढवणारे अधिकारी मिळतात, असे चांगले, वाईट अनुभव घेऊन ही गावे उभा राहतात. अशा परिस्थितीत चिंचणी गावाने मोठी प्रगती केली आहे, चिंचणी गावचे नाव महाराष्ट्रमध्ये झाले, देशात नाव व्हावे अशीही अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील हे पुनर्वसीत गाव आहे, आज सातारा जिल्ह्यात बांधकाम, मदत पुनर्वसन, ग्रामविकास अशी महत्वाची खाती आहेत, त्यांनी या गावास मदत करावी. चिंचणी राज्यात पहिल्या क्रमांकाचे गाव कसे होईल यासाठी प्रयत्न करूयात, ३६५ दिवस येणारी फळे गावात मिळतील अशी फळझाडे लावीत, गावातील शेती विकसित केली तर गाव विकसित होईल आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचे गाव होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here