Home महाराष्ट्र सरकारने विवाहसंस्था चालवली पाहिजे!

सरकारने विवाहसंस्था चालवली पाहिजे!

325

आजचे भारतीय सरकार नागरिकांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जिवनात अतिरिक्त हस्तक्षेप करीत आहे.लग्न कधी करावे, करावे कि न करावे, संतती किती असावी या खाजगी जिवनावर टांच ठेवली आहे. तर मग तरूणांच्या नोकरीची आणि लग्नाची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे. सरकारने कुंटुबात हस्तक्षेप केला आहे तर मग कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी विवाहसंस्था सुद्धा चालवली पाहिजे.

      सरकारी संस्था मोडीत काढून, विकून नोकऱ्यांची संख्या कमी केली आहे. त्यातही अनेक आरक्षणे लादून उच्चशिक्षित, कुशल तरूणांची गळचेपी होत आहे. देश विकास कर रहा है और युवक भकास हो रहा है. फिरभी कहते युवांके हातो देशका भविष्य है. यात लबाडी आणि बदमाषी दिसते. तरूण भकास झाला तर त्यांच्या हातातील देश विकास कसा करू शकतो?

      मागास आरक्षण, महिला आरक्षण, अन्य आरक्षणामुळे उच्चशिक्षित तरूण बेकार झाला आहे.नोकरी किंवा कामधंदा नसलेल्या तरूणांशी तरूणी लग्न करीतच नाहीत. तर मग यांनी मोहन भागवत, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांचे अनुकरण करावे का? असे ब्रम्हचारी राहाणे सर्वांना शक्य होईल का? याचा विचार मोहन भागवत, नरेंद्र मोदी,योगी आदित्यनाथ करतील का?

          भारतातील जाती गणना करतात तसे अविवाहित तरूणांची गणना केली पाहिजे. माणूस जन्माला आला आणि कुवारा मरून गेला. यात कसली संस्कृती? संस्कृती चे आस्तित्व तर कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्थामधे असते. तिच व्यवस्था मोडकळीस काढली तर संस्कृती कशात दिसेल?ढोल, ताशा, डिजे, दारू, नंगानाच मधे?

        आज रोजी ३३ टक्के तरूण अविवाहित आहेत. नोकरी नाही. कामधंदा नाही. लग्न नाही. स्वताचे कुटुंब नाही. म्हणून संतती नाही. यात अनेकांचे मानसीक संतुलन ढासळलेले आहे. ते गुन्हेगारी कडे वळत आहेत. आत्महत्या करीत आहेत. पैसा नाही म्हणून कोणालाही मत विकतात. पैसा मिळावा म्हणून गुंड, गुन्हेगारांकडे रोजंदारीवर जातात. ईच्छा नसतांना अपरिहार्य कारणे तरूण चुकीच्या दिशेने जात आहे. याला जबाबदार आजचे सरकार आहे.

      तरूणांनी सुद्धा आता राष्ट्रीय संपत्तीचे गणित शिकले पाहिजे.तरूण कंगाल आणि पुढारी मालामाल कसा? जळगाव जिल्ह्यातील अकरा आमदार आणि दोन खासदाराकडे असलेली संपत्ती ही तरूणांच्या वाट्यातील चोरलेली आहे. तरूण बेकार आणि मंत्री कुबेर कसा?कारण या चोरांनी तरूणांच्या ताटातील चोरलेले आहे. जिल्हा नियोजन समीतीचा अर्धा निधी हे आमदार खासदार मंत्री चोरून नेत आहेत. हे गणित, हे समीकरण तरूणांनी अभ्यासले पाहिजे. नोकर, व्यापारी, उद्योजक यांची संपत्ती बेरीज पद्धतीने वाढते पण आमदार खासदार मंत्री यांची संपत्ती गुणाकार पद्धतीने वाढते. हे गणित तरूणांना कळले पाहिजे,समजले पाहिजे,उमगले पाहिजे. चोरांकडून आपला वाटा जप्त केला पाहिजे.

       संपत्तीचे धृवीकरण हे कुटुंबव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थेला घातक असते. ती अवस्था आज भारतात बनलेली आहे. तशीच देशाची संपत्ती आमदार खासदार मंत्र्यांच्या खिशात जमा झालेली आहे. त्यामुळे आजचा युवा विपन्नावस्थेत,विषण्णावस्थेत जगत आहे. नोकरी, कामधंदा, रोजगार, लग्न, कुटुंब, संतती यापासून वंचित झालेला आहे. ही अवस्था भयंकर वाईट आहे. धोकेदायक आहे.स्फोटक आहे. विचार करावा लागेल.तरूण जागला, भडकला तर काय करू शकतो?

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here