


चिमूर- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि ‘सर्च’ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “चंद्रपूर जिल्हा दारू वापरा विषयी सद्यस्थितीचे सर्वेक्षण 2025 या उपक्रमांतर्गत दिनांक 10 मार्च 2025 रोज सोमवार ला रासेयो स्वयंसेवकांना प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुनंदा अस्वले यांचे हस्ते करण्यात आले. सर्च, गडचिरोली चे डॉ. महेश देशपांडे, डॉ. राजेंद्र ईसासरे व चमू यांनी महाविद्यालयीन स्वयंसेवकांना सर्वेक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले. दिनांक 10 आणि 11 मार्च ला चिमूर तालुक्यातील एकूण 15 गावांचे 334 कुटुंबांच्या सर्वे करून दिनांक 12 मार्च ला प्राचार्यांच्या हस्ते सर्वेक्षण अहवाल ‘सर्च’ च्या सुपूर्द करण्यात आला. या सर्वेक्षण कार्यक्रमात 25 रासेयो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वयंसेवकांना व महाविद्यालयाला ‘सर्च’ द्वारा प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बिजनकुमार शील आणि सह-कार्यक्रमाधिकारी डॉ. सुमेध वावरे यांनी विशेष प्रयत्न केले.













