


गंगाखेड प्रतिनिधी
येथील व्यंकटेश नगर रहिवासी असलेले पालम पंचायत समितीचे लेखा अधिकारी सुनील आवचार यांना रात्री दोन च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ दुःखद निधन झाले. सुनील
अवचार हे गंगाखेड परभणी आणि सध्या पालम येथे लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा अत्यंत मनमिळाव स्वभावाचे व खिळाडू वृत्तीचे होते दिनांक13 मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजता सुमारास झोपेत असताना तीव्र हृदयविकाराचा झटका आला असता त्यांना खाजगी रुग्णालयात नेले असतात डॉक्टरांनी मयत घोषित केले या दुःखद घटना मुळे परिसरात आणि कार्यालयामध्ये शोक कळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,अविवाहित मुलगा मुलगी दोन भाऊजी आणि पुतणे काका असा मोठा अवचार परिवार आहे. सायंकाळी चार वाजता गंगाखेड गोदावरी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक वकील पंचायत समिती कार्यालयीन कर्मचारी शिक्षक प्राध्यापक मंडळी हजर होती.













