Home चंद्रपूर अदाणी स्किल सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन 

अदाणी स्किल सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन 

171

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.10मार्च):-अदाणी फॉउंडेशन एसीसी चांदा सिमेंट वर्क्सच्या वतीने नकोडा येथील अदाणी स्किल सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा मध्ये परीसरातील एकूण 250 महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.क्वीना फर्नांडो प्राचार्य माउंट कार्मेल स्कूल हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निविताताई ठाकरे सरपंच, शालीनी ताई टेकाम सरपंच, तनुश्री बंदूरकर माजी सरपंच, ममता गोरे ग्राम. सदस्य हे होते. दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर पुष्पगुछ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.  

क्वीना मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना आरोग्य, शिक्षण याबद्दल जागृत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अक्षय पतंगे साईट सि एस आर हेड, तर सूत्रसंचालन यमुनाताई पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. रुपेश कुकडे प्रकल्प अधिकारी अदाणी फॉउंडेशन, प्रगती पाल अदाणी फॉउंडेशन, शुभांगी नगराडे, प्रतीक्षा मोहितकर, सौरभ मून, गणेश डोरलीकर, सोनूताई असुतकर कल्याणी खमणकर व महिला लोकसंचालित केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here