


✒️शिवणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
शिवणी(दि10मार्च):-येथील महिला मंडळाने जागतिक महिला दिन उत्साहात पार पाडला. यात महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शासनाच्या योजना व शेतीसंबंधीत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले, तसेच थोर संत इतिहासपुरुष यांचे महिला जागृती पर पुस्तके संपूर्ण महिलांना वाटण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रवींद्र पानपटे, उपसरपंच सत्यशीला भोयर, सारिका गाडगे, गणेश भोयर पोलीस पाटील डॉ आदित्य तिवारी, डॉ सुनील पद्मावार, सखुबाई निब्रट, शंकर लोनगाडगे, प्रवीण वरभे, दिनेश काकडे, मधुकर पानपटे, साईनाथ भोयर, आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला गावातील अनेक महिला व पुरुष हिरीरीने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विद्या पाहणपटे तर आभार प्रदर्शन माधुरी पहानपटे यांनी केले यावेळेस योगिता बनकर, सरस्वती कोडापे, माया मडावी, प्रतिभा मडावी, अनिता मडावी, अनिता जिजिलवार, अंजली मडावी, रेखा कोडापे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.














