Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात “संविधान गौरव महोत्सवाची” सांगता

ग्रामगीता महाविद्यालयात “संविधान गौरव महोत्सवाची” सांगता

187

 

चिमूर – सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे ३ मार्च 2025, रोज सोमवार ला “संविधान गौरव महोत्सव” अंतर्गत आयोजित विविध स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरित करून महोत्सवाची सांगता करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात भारताच्या आदर्श संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, पोस्टर व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धांचे आयोजन प्रा. डॉ. सुमेध वावरे, प्रा. डॉ. बिजनकुमार शील व प्रा. प्रफुल ढोणे यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टरद्वारे, संविधानाने भारत कसा घडविला याचे उत्तम सादरीकरण केले. पोस्टर स्पर्धेत कु. धनश्री प्रमोद गायधनी हिने प्रथम तर कु. प्रणाली ईश्वर चनुरकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला व प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सार्थक संदीप डेंगे या विद्यार्थ्यांनी पटकावला. तसेच “भारतीय राज्यघटनेची ओळख” या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कु. प्रणाली ईश्वर चरूरकर हिने प्रथम क्रमांक आणि सार्थक संदीप डेंगे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा. रोहित चांदेकर, डॉ. संदीप सातव, डॉ. सुमेध वावरे व डॉ.बिजनकुमार शील आदींनी सहकार्य केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here