Home महाराष्ट्र गंगाखेड येथे माउंट लिटेरा झी स्कूल विद्यार्थ्यां साठी सज्ज

गंगाखेड येथे माउंट लिटेरा झी स्कूल विद्यार्थ्यां साठी सज्ज

433

▪️नर्सरी ते सातवी पर्यंत इंग्रजी माध्यम शिक्षण

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.2फेब्रुवारी):-देशातील सर्वात मोठे शैक्षणिक जाळे असणारे झी लर्न चे माउंट लिटेरा झी स्कूलच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन (दि.4 मार्च मंगळवार) रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या जवळ डॉक्टर लाईन, गंगाखेड येथे होणार असून दिनांक 4 मार्चपासून नवीन वर्ष 2025-26 नर्सरी ते सातवी पर्यंत इंग्रजी माध्यम प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.गंगाखेड शहरातील परभणी रोड वरील चौधरी पेट्रोल पंपाच्या समोर चौधरी दूध डेअरीच्या बाजूला भव्य अशा शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून गंगाखेड शहर व परिसरातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी माउंट लिटेरा झी इंग्रजी माध्यम शाळा सज्ज झाली आहे.

या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.जगभरातील ज्ञान आणि शिक्षण यांच्यात संतुलन साधण्यासाठी २०१४ मध्ये माउंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली ही शाळा झी लर्न लिमिटेड या शिक्षण साखळीद्वारे व्यवस्थापित असुन ज्याच्या देशभरात माउंट लिटेरा झी स्कूल या ब्रँड नावाखाली ८० हून अधिक शाळा आहेत, ते किडझी देखील चालवते जे देशभरातील १३५० हून अधिक प्रीस्कूलसह आशियातील सर्वात मोठे प्रीस्कूल नेटवर्क आहे.

म्हणूनच गंगाखेड येथे शाळेची प्रशस्त इमारत बांधली असून शाळेत अनुभवी शिक्षक वृंद डिजिटल क्लासरूम इतर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी भव्य मैदान आरओ चे शुद्ध पाणी, विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची सुविधा, क्लास रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आदि व्यवस्था करण्यात आली आहे पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील मोबाईल क्रमांक 9556560303,9556560303

वर किंवा शहर कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here