Home महाराष्ट्र करजली घटनेचा आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी

करजली घटनेचा आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी

209

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):-सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजली गावामध्ये एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर येथील नराधमाने बलात्कार करून तिचा खून केला या घटनेचे त्रिव पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभरात उमटत आहेत. गंगाखेड येथील नागरिकांच्या वतीनेही निषेध व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे (दिनांक 17 फेब्रुवारी सोमवार) रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील करजली गावामध्ये घडली येथील पाच वर्षाचा चिमुरडीवर नराधमाने बलात्कार करून तिचा खून केला अशा नराधमाना कठोर ते कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अमजद पठाण, खुरम चाऊस, अजिज सय्यद, फारुक पटेल, बबलू पठाण, जुबेर शेख, वजीर पठाण, समीर शेख, इमरान शेख, सिराज शेख,ईसा सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here