Home चंद्रपूर सहकारातील सर्व घटकांपर्यंत सहकार भारतीचे कार्य जोमाने पोहचवा-राज्य महामंत्री विवेक जुगादे यांचे...

सहकारातील सर्व घटकांपर्यंत सहकार भारतीचे कार्य जोमाने पोहचवा-राज्य महामंत्री विवेक जुगादे यांचे प्रतिपादन

198

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8जानेवारी):-सहकारी चळवळीने अनेक उद्योग उभे केले, रोजगार निर्माण केला यांतून अनेकांचे संसार समृद्ध झाले. सहकाराला आदर्शवत करण्यासाठी आवश्यक मूल्ये सहकार भारतीने समाज मनात रुजविलेले आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ तर आदर्शवत प्रेरणा देणारी आहे. आज केंद्र सरकार मध्ये सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण झालेले आहे, यांसारख्या सहकार भारतीच्या अनेक मागण्यांची फलश्रुती आपण बघतो आहोत. आज सहकार भारतीच्या कामाचा निर्माण झालेला दबदबा कायम ठेवायचा आहे. इतकेच नाही तर सहकार भारती चे काम सहकारातील सर्व घटकांपर्यंत जोमाने पसरवा असे आवाहन सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले.

सहकार भारती जिल्हा चंद्रपूर द्वारा भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव चे चिमुर शाखा कार्यालय नारायण भवन येथील स्व. नारायणराव तामशेट्टीवार गुरुजी सभागृहात आयोजित सहकार भारतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

याप्रसंगी विवेक जुगादेंसह सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निलिमा बावणे, प्रदेश सचिव विनोद भिमनवार, प्रदेश ग्रामीण पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख अनिल मेंढे, प्रदेश मस्य प्रकोष्ठ प्रमुख वासुदेव सुरदुसे, नागपूर विभाग प्रमुख संजयकुमार रोकडे, नागपूर विभाग सहप्रमुख विजय गोटे, नागपुर जिल्हा मस्य प्रकोष्ठ प्रमुख प्रकाश डायरे, जेष्ठ कार्यकर्ते भार्गवदत्त कात्यायन, महेश मासुरकर प्रभुती मंचावर विराजमान होते.

मान्यवरांच्या उद्बोधना नंतर विभाग प्रमुख संजयकुमार रोकडे यांनी सहकार भारतीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून सतीश वासमवार यांच्या तर जिल्हा महामंत्री म्हणुन सौ. पुष्पा गोटे यांच्या नावाची घोषणा केली.

जिल्हाध्यक्ष सतीश वासमवार यांनी याप्रसंगी समस्त जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. जिल्हा कार्यकारिणीत (पद व नाव) यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणी च्या सोबतीने सहकार भारती चे कामाचा जोमाने विस्तार करू असा विश्वास याप्रसंगी नवनियुक्त जिल्हा अध्यक्षांनी व्यक्त केला. नव्या कार्यकारिणीतील सर्व घटकांचे समाजातील नानाविध घटकांतुन अभिनंदन होत असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गोटे, संचालन आतीश कानापुरवार यांनी तर आभार पुष्पा गोटे यांनी मानले.जिल्ह्यातील सहकाराचे सर्व घटकातील प्रमुख कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here