Home महाराष्ट्र भागवत सदावर्ते यांची आरेगांव सरपंचपदी निवड

भागवत सदावर्ते यांची आरेगांव सरपंचपदी निवड

240

✒️मेहकर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मेहकर(दि.8जानेवारी):- मेहकर तालुक्यातील आरेगांव ग्राम पंचायत च्या सरपंच पदी भागवत कचरू सदावर्ते यांची निवड करण्यात आली आहे. आरेगांव ग्राम पंचायतचे माजी सरपंच सौ. दिपाली दिलीप सदावर्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर भागवत सदावर्ते यांची निवड करण्यात आली. तरुणांच्या हातात सत्ता असल्याने विकासाला चालणा मिळते म्हणून गावकऱ्यांनी तरुणच सदस्य निवडीवर भर दिल्याने गावाच्या विकासाची अपेक्षा सर्वांनाच आहे.

भागवत सदावर्ते हे तरुण व विकासाभिमुख व्यक्तीमत्व तर आहेतच शिवाय ते उच्च शिक्षीत असुन त्यांना पत्रकारीतेचा खुप मोठा अनुभव सुद्धां आहे. पत्रकारिता मध्ये मास्टर करून समाजातील आवाज मोठा करण्याचे काम पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी केले. तसेच गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते ग्राम पंचायत निवडणूक लढवून पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक मताने निवडून सुद्धा आले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि ऐतिहासिक मताने निवडून आल्याने जबाबदारी वाढतेच. जबाबदारीचे भान ठेवून त्यांनी ग्रामपंचायत च्या माध्यमातून गोरगरीबांचे कामे केले.

आता तर सरपंच पदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांची जबाबदारी अजूनच वाढलेली आहे. गावातील जागृत व गोरगरीब लोकांना भागवत सदावर्ते यांच्या कडून विकासाची अपेक्षा आहे. लोकांच्या अपेक्षेचा प्रमाणे काम करून गावाचा शक्य तो विकास करण्याचा शब्दही भागवत सदावर्ते यांनी दिला आहे. भागवत सदावर्ते यांच्या सरपंच पदी झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. याच कौतुक आणि अभिनंदनाने भागवत सदावर्ते यांच्या वरची जबाबदारी अजून वाढली असुन मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी भागवत सदावर्ते यांना दक्ष रहावे लागणार आहे. हि निवड करतात प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी नरोटे, तलाठी खिल्लारे साहेब व मंडळ अधिकारी चनखोरे साहेब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here