


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.22डिसेंबर):- नुकतेच परभणी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या समोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली. ही बाब संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालवणारी घटना आहे .तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या एका भीमसैनिकाचा पोलिसांच्या अमानुष मारहाणी पोलीस कोठडीतच मृत्यू झाला.
या दोन्हीही घटनेचा निषेध करण्यासाठी बौद्ध समाज तालुका ब्रह्मपुरी यांच्या वतीने दिनांक 23 डिसेंबर सोमवारला दुपारी 12 वाजता स्थानिक बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौकातून भव्य जन आक्रोश निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. सदर मोर्चा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौक, सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर पुतळा भीम नगर, तिथून मर्दानी चौक, फवारा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आगेकूच करीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकेल व मान.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल.असे मोर्चाचे निमंत्रक प्रशांत डांगे, सुधाकर पोपटे ,डेव्हिड शेंडे, लीलाधर वंजारी, यांनी कळविले आहे.














