Home महाराष्ट्र २६ ते ३१ डिसेंबर रोजी चिमूर येथे रोटरी उत्सव मेळाव्याचे आयोजन

२६ ते ३१ डिसेंबर रोजी चिमूर येथे रोटरी उत्सव मेळाव्याचे आयोजन

298

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12डिसेंबर):-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बि. पि. एड. ग्राउंड (आदर्श विद्यालय) वडाळा (पैकु) चिमूर येथे रोटरी क्लब तर्फे रोटरी उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे या वर्षी दिवाळीमध्ये रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रोटरी उत्सव मेळाव्याचे आयोजन दि २६ ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक बि. पि. एड. ग्राउंड (आदर्श विद्यालय) वडाळा (पैकु) चिमूर येथे करण्यात येत असल्याची माहिती रोटरी क्लबने पत्रकार परिषदेत दिली .

या मेळाव्यात फॅशन शो स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, विविध प्रकारचे खेळ, ऑर्केस्ट्रा, संगीत स्पर्धा, महिला तसेच युवक आणि युवतीसाठी विभिन्न स्पर्धा, एड्स जनजागृती पथनाट्य, व्यक्तिमत्व विकास व सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, विविध प्रकारचे उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री स्टॉल्स, स्वादिष्ट व्यंजनांची स्टॉल्स तसेच आनंद मेला इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला रोटरी क्लब चिमूरचे अध्यक्ष विशाल गंपावार, माजी अध्यक्ष वैभव लांडगे, सचिव कैलास धनोरे, पवन ताकसांडे, अभिजित बेहते, विनोद भोयर, शाम बंग, परेश दंदे, स्वप्निल मुंगले, गुरुदास ठाकरे, राजेंद्र संगमवार, राकेश बघेल, डॉ. महेश खानेकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here