


🔺शांततेत मोर्चा काढत संविधान प्रेमीनी दिले प्रशासनाला निवेदन
✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515
गंगाखेड(दि.12डिसेंबर):-परभणी येथील दिनांक 10 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मानसीक विक्रतीच्या व्यक्तीने विटंबना केली या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून संविधानप्रेमीं कडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्या व्यक्तीस व त्यामागील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे त्याचे पडसाद गंगाखेड शहरातही उमटले या घटनेचा निषेध करत आज (दिनांक 11 डिसेंबर बुधवार) रोजी गंगाखेड शहर बंद पुकरण्यात आले होते.
या बंद ला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाणे कडकडीत बंद ठेवून सहकार्य केलें प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून बस सेवा बंद ठेवण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्या वतीने परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत परभणी शहर वगळता गंगाखेड शहरामध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडले नाही शांततेत संविधान प्रेमिंकडून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून घोषणाबाजी करत भगवती मंदीरापासुन संविधान प्रेमिनी शांततेत मोर्चा काढला हा मोर्चा दिलकश चौक, हेडगेवार चौक, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे मोर्चाचे समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.
या ठिकाणी समाज बांधवांतर्फे मनोगते व्यक्त करण्यात आली या प्रकरणातील आरोपीस व आरोपीच्या मागे असलेल्या खऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली.तसेच आंबेडकरी समाज बांधवांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन हि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.सर्व आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांना देण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता














