Home यवतमाळ शाळेच्या विद्यार्थ्यांने शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनात भरवली शाळा (राष्ट्रगान गाऊन केली सुरुवात)

शाळेच्या विद्यार्थ्यांने शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनात भरवली शाळा (राष्ट्रगान गाऊन केली सुरुवात)

226

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ८ ऑगस्ट) तालुक्यातील मोरचंडी या गावातील शासकीय शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण अधिकारी उमरखेड यांच्या दालनात अतिरिक्त शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षण अधिकारी यांच्या दालनातच भरवली.

शाळा मोरचंडी गावातील शाळेमध्ये इयत्ता १ ते ७ विद्यार्थ्यांची पटसंख्या २४७ असून एवढी पटसंख्या असणाऱ्या शाळेवर फक्त चारच शिक्षक आहेत.शासकीय नियमानुसार इतकी पटसंख्या असणाऱ्या शाळेवर किमान सात ते आठ शिक्षक आवश्यक असतात.

कमी शिक्षकांची संख्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागत आहे. याबाबत गावातील पालक वर्गांनी शिक्षणाधिकारी यांना अतिरिक्त शिक्षक देण्याबाबत वारंवार निवेदन देखील दिले.

यापूर्वी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी अतिरिक्त शिक्षकाची मागणी करून ती पूर्ण न झाल्यास नाईलाज ने आम्हाला आमचे विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या दालनामध्ये आणावे लागेल असे निवेदनात नमूद केले होते. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी पालक वर्गाने दिलेल्या मुदतीमध्ये अतिरिक्त शिक्षकाची पूर्तता केली नाही. त्या कारणास्तव गावकऱ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसह उमरखेड येथील शिक्षणाधिकारी यांच्या दालनातच थेट शाळा भरवली.

राष्ट्रगान म्हणून विद्यार्थ्यांने दालनातच बसून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्यापुढे साकडे घातले.

चौकट:- दोन तास चाललेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पुढे शिक्षण अधिकारी यांनी मोरचंडी शाळेवर तात्काळ दोन अतिरिक्त शिक्षक देऊ व आवश्यक असणाऱ्या उर्वरित शिक्षकाची लवकरच पूर्तता करेल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here