


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
यवतमाळ- (दि. 4 एप्रिल) जिल्ह्यातील तालुका घाटंजी येथील मुर्ली या गावी सामूहिक बलात्कार झालेल्या जयश्री (काल्पनिक नाव) या महिलेला व तिच्या कुटूंबाला न्याय मिळावा व सर्व नराधमांन विरुद्ध फास्टट्रॅक न्यायालयात प्रकरण चालून फाशीची शिक्षा व्हावी.
अशी मागणी नारी रक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
दि.२६ मार्च २०२४ रोजी रात्री १० वाजता घाटंजी येथील जयश्री (काल्पनिक नाव) हिचे आपल्या पती सोबत घरगुती वाद झाला रागाच्या भरात ती मुर्ली या गावावर आपल्या गावी रात्रीच स्कुटीने घाटंजी येथे जात असताना आरोपी नयन राऊत, चेतन वारकड, वैदिप देक्कते, दर्शन गोपने या चार नराधमांनी तिला वाटेल अडवणूक करून रोडच्या बाजूलाच असलेल्या शेतातील फार्म हाऊस वर जबरदस्तीने फरफटत नेऊन आळीपाळी येणे बलात्कार केला व बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले या चारही मनुष्य जातीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना अटक करून कठोर कारवाई करून संबंधित प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अशी मागणी नारी रक्षा समिती यवतमाळ मार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली जणेकरून या पुढे अशी कृत्य करणाऱ्या नराधमांवर कुठेतरी वचक निर्माण झाली पाहिजे या साठी नारी रक्षा समितीचे व संघटनेचे सदस्य समिती अध्यक्ष विनोद दोंदल, शीलाताई इंगोले चेतनाताई राऊत, घनश्याम दरणे सर, रोशन पडोळे, प्रद्युम्न देशकर, शिवाजी पुरी, विकास लसंते, विजय बुंदेला, डॉ. बाळकृष्ण सरकटे, राजेश देशमुख, अरविंद झाडे, अर्पण शेरेकर, सचिन खाडे, मीनाक्षीताई सावळकर, विद्याताई पाताळबंक्षी, प्रभोदिनीताई रामटेके, चंदूभाऊ चौधरी, ओम तिवारी, लियाकत बी शेख, सरस्वतीताई ठाकूर सविताताई चौधरी, वीणाताई नागदेवे, इत्यादी सामाजिक राजकीय सदस्य उपस्थित होते.














