Home यवतमाळ अपहरण करून सोडून दिलेल्या आरोपीस अटक करून न्यायालयात दाखल.

अपहरण करून सोडून दिलेल्या आरोपीस अटक करून न्यायालयात दाखल.

234

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:-नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोथली येथील मुलीला रस्त्यात उचलून तुला गावाला सोडून देतो म्हणून राजेश्याम माटे रा.भिकेश्वर याने मुलीला उचलून पळवून नेले. त्याने मुलीला घेऊन कोर्धा येथे नेऊन त्याने तिचे कपडे काढून ओले केले आणि तिला पहाटेच तिचे गावाशेजारी सोडून दिले तोपर्यंत मुलीचे अपहरणं झाल्याने पोलीस शोध घेत असताना विविध गुप्त माहितीचे आधारे पोलिसांनी अपहरणं करणाऱ्या राजेश्याम माटे याला आज रात्री १०वाजता अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीस पोलिसी हिसका दाखविताच आरोपीनी झालेली कहाणी सांगितली. आरोपी विवाहित असून पत्नी माहेरी असून मसल्याचा व्यवसाय करीत असून त्याने याआधी मिंडाळा -कोडेपार मार्गांवर असा प्रकार केला पण त्याची तक्रार झाली नसल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सर्व तपास करून न्यायालयात पुढील तपास करण्यासाठी आरोपीस हजर केले मात्र वृत्त लिहपर्यंत आरोपीस न्यायालयाकडून पोलीस तपासासाठी परवानगी देण्यात आली नव्हती तरीपण आरोपी पोलिसाच्या ताब्यात असल्याने त्यांच्या पत्नीला तात्काळ बोलाविण्यात आल्याचे कळते यामुळे सध्यातरी अशा प्रवृत्तीला आळा बसावा याकरिता पोलिसांनी योग्य पावले उचलून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस स्टेशन नागभीड चे ठाणेदार कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here