Home महाराष्ट्र सातारा शहरात वाह,, क्या, हॉटेल दावत..

सातारा शहरात वाह,, क्या, हॉटेल दावत..

500

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : सातारा शहराची ओळख ही जशी कंदीपेढ्याने झाली आहे. त्याच धर्तीवर आता हॉटेल दावत म्हणजे नाम ही काफी है! अशा पद्धतीने आता सातारा शहरात या हॉटेलने अल्पावधीमध्ये चवीने लोकप्रियता निर्माण केलेली आहे.
साताऱ्यात चवीचे खाणार त्यांना निश्चितच हॉटेल दावत मध्ये समाधान मिळणार असं त्यांच्या घोषवाक्य बनले आहे.

सातारा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी पासून पोलीस मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सातारा चिकन सेंटरच्या शेजारी हे हॉटेल दावत आहे .चायनीज शाही, बिर्याणी हाऊस आणि तंदूर हाऊस म्हणून उभे राहिलेले आहे. या ठिकाणी सोरमा ,चिकन टिक्का, चिकन रोल, चिकन समोसा, बैदा रोटी, ड्रम स्टिक असं चविष्ट व ताज्या चिकन व मटन पासून तयार करण्यात आलेले हे पदार्थ म्हणजे जिभेवर चव आणि पौष्टिक जेवणाने भूक भागवली जाणार आहे. याची खरी खुरी गॅरंटी आहे . खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शाहरुख नासीर खान डांगे व त्यांची मॅासाब व नातेवाईक, मुल व दाजी शहाबाज पठाण यांनी पाच सहा वर्षांपूर्वी वडूज नगरीमध्ये दावत हॉटेल उभारणी केली. अनेक नामांकित व सर्वसामान्यांनी या हॉटेलच्या व येथील शाकाहारी- मांसाहारी जेवण व बिर्याणी व इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतलेला आहे. त्यामुळे आता सातारा शहर परिसरातील खवय्यांसाठी साताऱ्यात नवीन दालन उभारले आहे. या हॉटेलमध्ये सर्व पदार्थ हे तयार करून मिळत आहेत.
आज राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रणजीत भैय्या देशमुख , माण – खटाव विधानसभेचे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष व वडूज माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव ,युवा उद्योजक इम्रान बागवान ,रोहन वाघमारे, सनी भोसले व निलेश घार्गे व जेष्ठ पत्रकार अजित जगताप, विशाल कदम व मान्यवरांनी येऊन शुभेच्छा दिलेले आहेत.
महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण याची अनुभूती पाहण्यास मिळालेली आहे. अनुभवातून समृद्धी आणि समृद्धीतून समाधान अशा पद्धतीने या ठिकाणी खाद्यपदार्थांबाबत सेवा पुरवण्यात येत आहे. संपूर्ण कुटुंब असं या ठिकाणी एकदा येऊन अनुभव घ्यावा असे हे खाद्य दालन आहे. या ठिकाणी पार्सल सेवा सुरू करण्यात आलेली आहे.लवकर सातारा शहरांमध्ये हॉटेल दावत म्हणजे खाणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगले हॉटेल उभारल्याबद्दल सातारकरांनी त्यांचे मनापासून आभार मानलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here