Home यवतमाळ पुसद ढाणकी सुरु आसलेली बस अचानकपणे बंद विभाग नियंत्रक गोजरी यांच्या...

पुसद ढाणकी सुरु आसलेली बस अचानकपणे बंद विभाग नियंत्रक गोजरी यांच्या आदेशाला डावलून पुसद आगार व्यवस्थापकाची दादागिरी

201

 

 

ढाणकी प्रतिनिधी, राजेश घुगरे

 

पुसद आगाराने ढाणकी पुसद, महागाव सवान गुंज फुलसावंगी, निगणुर ही बस सुरु होती पण आगार व्यवस्थापक पांडे यांनी आपल्या मनमानी कारभाराने पुसद ढाणकी बस सेवा बंद केली आहे या रस्त्यावर आसलेल्या गुंज सवना महागाव फुलसावगी ,निगणुर या गावच्या विद्यार्थ्यांना व तसेच शेतकऱ्यांना प्रवाशाना , व रुग्णांना जाणे येणे करणे सोईयचे होते. त्याचा वेळ व पैसा ,बचत होते, त्याचप्रमाणे फुलसावगी पासुन आसलेल्या आजुबाजुच्या खेड्यातील कुपटी ,मोहपुर,वानोळा,पानोळा,ग्रमीण भागातील जनतेचे आतिशय हाल होत आहे. कारण पुसद ढाणकी ही एक फेरी आसल्यामुळे आणी फेरी आगार व्यवस्थापक श्री पांडे यांनी जाणून-बुजून बंद केली त्यांचे साठे लोटे आवैध वाहतुकीसंघ संबध असल्याचे असे नागरिकांमध्ये व प्रवाशांमध्ये चर्चा होत आहे .अनेक या रस्त्यावर पुसद ते फुलसावगी पर्यत लक्झरी या धावत असल्याने यांना व संबंधित अधिकाऱ्यांना हाप्ते भेटत आहे का ? अशी जनतेमध्ये चर्चा उलटसुलट चालू आहे .
यवतमाळ चे विभाग नियंत्रक आमोल गोंजारी हे आगार व्यवस्थापक यांची पाठराखण करीत असल्याचे चित्र दिसत आहे
अशा मुजर कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात यावी पुसदचे आगार व्यवस्थापक आपला ऑफिसचा फोन ही बंद करून ठेवतात प्रवाशांनी कोणाकडे तक्रारी करायची व समस्या मांडाव्या अशा कामचुकार आगार व्यवस्थापकावर कडक कारवाई करून यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी माधवराम मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी, यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here