Home महाराष्ट्र चांगले वकील निर्माण होण्यासाठी वाचनाची गरज – के.पी .नांदेडकर

चांगले वकील निर्माण होण्यासाठी वाचनाची गरज – के.पी .नांदेडकर

316

 

पुणे- नॉर्थ ईस्ट लॉयर फोरम या संघटनेचा दिमाखदार उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील विश्रांतवाडी येथील कस्तुरबा हॉल येथे नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे प्रभारी जिल्हा न्यायाधीश केपी नांदेडकर , पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप,पुण्याचे जिल्हा न्यायाधीश के एन शिंदे ,महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अहमदखान पठाण, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्षॲड. सतीश मुळीक, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.केतन कोठावळे, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्षा ॲड.वैशाली चांदणे , पुणे बारअसोसिएशनच्या माजी सेक्रेटरी व पुणे नॉर्थ ईस्ट लॉयर फोरमच्या फौंडर ॲड.सुरेखा भोसले , पुण्याच्या ज्येष्ठ वकील वपुणे नॉर्थ ईस्ट लॉयर फोरमच्या फौंडर ॲड.माधवी पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
या संघटनेचा *पहिला जीवन गौरव पुरस्कार* ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नारायण कौतिक पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी प्रभावती पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
“ज्ञान देवूया आणि ज्ञान घेवूया आणि वाचलं तर वाचाल” हे या संस्थेचे ब्रीद असणार आहे..
वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा हा उद्घाटन समारंभ होता, सदरचा कार्यक्रम पहिल्या सत्रात पार पडला.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सन 2023-24 या वर्षासाठीच्या पुणे बार असोसिएशन मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच निवडणुकीतील उमेदवारांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या संघटनेचे वकील व्यवसाय करणाऱ्या वकिलांना एकमेकांच्या समस्या, अडचणी समजून घेणे, त्यासाठी सामूहिकरित्या मदत करणे, कायदेविषयक ज्ञान देणे व व्याख्याने आयोजित करणे, मोठे मोठे चर्चासत्र घडविणे, जूनियर वकिलांना मार्गदर्शन करणे हे मुख्य उद्देश आहेत..

तसेच यापुढे दरवर्षी संघटनेतर्फे “लाईफ अचीवमेंट अवॉर्ड” म्हणजेच जीवनगौरव पुरस्कार, वकील क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ यांना बहाल करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या ॲड. सुरेखा भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या फौंडर ॲड.माधवी पोतदार यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे नॉर्थ ईस्ट फोरमच्या फौंडर सुरेखा भोसले व माधवी पोतदार तसेच विश्रांतवाडी वकील परिवार उत्तर पूर्व विभाग पुणे यांनी केले होते. कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील वकील व बार कौन्सिलच्या निवडणुकीतील उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here