Home महाराष्ट्र लिंबागणेश परीसरात वराहांकडुन शेतपिकांचे नुकसान; वनविभाग झोपेत संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्या...

लिंबागणेश परीसरात वराहांकडुन शेतपिकांचे नुकसान; वनविभाग झोपेत संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्या आणि मळा :- डॉ.गणेश ढवळे

280

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरातील शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना समोरे जावे लागत असुन संकटाची मालिका सुरूच असुन आता शेतक-यांना वन प्राण्यांच्या हैदोसाला सामोरे जावे लागत असुन शेतातील पिके उद्ध्वस्त होत असुन हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असुन शेतकरी हवालदिल झाले आहेत.मात्र वनविभागाकडुन याकडे दुर्लक्ष होत असल्याने वनविभाग गाढ झोपेत असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांमधुन उमटत आहे. शेतकरी संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्या तर हल्ल्यापासून संरक्षणासाठी मळा करून रात्री जागून काढत आहेत .संबधित प्रकरणी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बीड काकडे यांना केली आहे.

सविस्तर माहितीस्तव

बीड तालुक्यातील बालाघाटा वरील लिंबागणेश पंचक्रोशीतील डोंगराळ भागातील पोखरी (घाट),पिंपरनई,बेलगाव,फुकेवाडी, सोमनाथवाडी आदि परीसरातील शेतशिवारात संचार करणाऱ्या वराहांनी धुमाकूळ घातला असुन झुंडीच्या झुंडी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत आहेत.

संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडुन रंगीबेरंगी साड्यांचा वापर आणि हल्ल्यापासून संरक्षणासाठी मळा

शेतातील ज्वारी, भुईमूग,बटाटा आदि उगवलेल्या पिकांची डुकरांकडुन खाण्यापेक्षा नासधूस जास्त करत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रानडुकरे घाबरतात म्हणून रंगीबेरंगी साड्यांचे कु़पन करण्यात येत असुन रानडुकराच्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून शेतावर राखण करणा-या शेतकऱ्यांना उंचावर ‘मळा’ करून रहावे लागते.

वनविभागातील आधिका-यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज:- डॉ.गणेश ढवळे

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तसेच पिकांचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वनविभागाची असताना वनविभाग मात्र गाढ झोपेत असुन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्यांना गांभीर्य दिसुन येत नाही.संबधित प्रकरणी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बीड वैभव काकडे यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here