



रोशन मदनकर(उपसंपादक) मो.
88886 28986
ब्रह्मपुरी- ब्रह्मपुरी हे नावाजलेले शहर या शहरात शैक्षणिक सूविधा आणि वैद्यकीय सूविधा उत्तम दर्जाच्या असल्याने तसेच तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर रहदारी खुप मोठया प्रमाणावर असते.त्यामुळे केवळ रस्तेच चांगले असून चालतं नाही तर रोडच्या दोन्ही बाजूला मजबूत खडिकरण झालेले असणे आवश्यक आहे. मात्र ख्रिस्तानंद चौक ते देलणवाडी जो हायवे आहे. त्याच्या बाजूची अनेक ठिकाणची माती पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहे.त्यामुळे तेवढा रस्ता ओबडधोबड झालेला आहे.त्यामुळे रहदारीसाठी उचीत नाही.अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.सकाळी माॅरनिंग वाॅकला जाणारे सिनियर सिटीझन, तसेच स्थानिक लोकांना याचा त्रास होतो .
दिवसभर या हायवे वर रहदारी असते अशा वेळी पैदल चालणारे ल़ोकांना व बाईक धारक लोकांना हायवे वरून बाजूला खाली उतरतांना व हायवे वर गाडी चढतांना अडचण जाते.
अशा वेळेस एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता या रस्त्याच्या बाजूला संबंधित विभागाने मुरूम टाकून मजबुतीकरण करावे.अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडी ब्रह्मपुरीचे शहर महामंत्री प्रा.राजू भागवत सर यांनी केलेली आहे.














